शैक्षणिक सत्रातच करीअर मार्गदर्शन: डॉ. गावीत

शैक्षणिक सत्रातच करीअर मार्गदर्शन: डॉ. गावीत

सटाणा । प्रतिनिधी | Satana

यशाचे शिखर गाठण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये (students) शिस्त महत्वाची आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने शिस्त (discipline) आत्मसात केल्यास निश्चित आयुष्याला उज्ज्वल दिशा मिळू शकणार आहे.

शालेय शिक्षण (School education) पूर्ण केल्यानंतर नोकरी (job) व व्यवसायाच्या (business) दृष्टीने कोणत्या संधी उपलब्ध आहेत याचेही मागदर्शन विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच मिळेल याची व्यवस्था केली जाणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावीत (Tribal Development Minister Dr. Vijayakumar Gavit) यांनी येथे बोलतांना केले.

सटाणा (satana) येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहाचे उद्घाटन ना. गावीत यांच्या हस्ते आज करण्यात आले. या प्रसंगी आयोजित सोहळ्यात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. आ. दिलीप बोरसे (MLA Dilip Borse), आदिवासी अपर आयुक्त संदिप गोलाईत (Tribal Additional Commissioner Sandeep Golait),

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विकास मीना (Assistant Collector and Project Officer Vikas Meena), प्रांत बबन काकडे (Province Baban Kakade), तहसिलदार कैलास पवार (Tehsildar Kailas Pawar), गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे (Group Development Officer Pandurang Kolhe), कार्यकारी अभियंता डी.व्ही. पाटील, सहायक प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, आर.आर. पाटील आदी उपस्थित होते.

आज 75 विद्यार्थी क्षमता असलेल्या वसतिगृहाचे उदघाटन संपन्न झाले असल्याचे सांगत डॉ. गावीत पुढे म्हणाले, विद्यार्थी शिक्षणासाठी शहराकडे येतात परंतु राहण्याची सोय नसल्यामुळे शिक्षणात (education) अडथळा निर्माण होतो. परंतु ज्या ठिकाणी 50 टक्के पेक्षा अधिक आदिवासी लोकसंख्या असेल अशा ठिकाणी नियोजित आराखडा तयार करून मोठ्या क्षमेतेची वस्तीगृहे निर्माण केली जातील. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात व भाषेत शिक्षण घेता यावे, यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम विभागाने आखले आहेत. विद्यार्थ्यांना स्वत:च्या आवडीप्रमाणे कला, वाणिज्य, अभियांत्रिकी, वैद्यकीय यासह इतर क्षेत्रात शिक्षण घेता यावे यासाठी आदिवासी विभाग कटिबद्ध असल्याचेच सांगितले.

शिकण्याची जिद्द व चिकाटी प्रत्येक विद्यार्थ्याने ठेवून आपल्यासोबत इतरांनानी शिक्षणासाठी प्रोत्साहित करून सामाजिक जबाबदारी पूर्ण करावी. आज येथे कुस्ती, बॉक्सिंग, विविध खेळ, कला यात प्राविण्य मिळविलेले विद्यार्थीही उपस्थित आहेत ही बाब खुप प्रशंसनीय आहे. अशा खेळाडू विद्यार्थ्यांसाठी 10 किंवा 15 दिवसांचे कॅम्प आयोजन करून त्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येईल.

आगामी काळात बालपणापासूनच विद्यार्थ्यांना शालेय, महाविद्यालयीन शिक्षणासोबतच विविध कला, चित्रकला, खेळ, संगीत, वाद्य यांचेही प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने आदिवासी विकास विभागामार्फत प्रबोधनी निर्माण केल्या जाणार आहे. आदिवासी विभागाच्या शेतकरी, कामगार, महिला यांच्यासाठी विविध प्रकारच्या योजना आहेत. या योजनांचा लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे, असे आवाहन डॉ. गावित यांनी शेवटी बोलतांना केले.

यावेळी आदिवासी आश्रमशाळातील खेळ व कला यात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांचा डॉ. गावित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी डॉ. गावित यांच्या हस्ते वस्तीगृह इमारतीच्या कोनशिलेचे आनावरण करण्यात आले.

यावेळी आ. दिलीप बोरसे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी तर आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी आर.आर. पाटील यांनी केले. यानंतर सटाणा तालुक्यातील हरणबारी व भिलवाड येथील शासकीय आदिवासी मुलींचे व मुल्हेर येथील शाासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृहाचेही उद्घाटन ना.डॉ. गावित यांच्या हस्ते संपन्न झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com