मुंढेगाव जवळ भीषण अपघात; तीन ठार, तीन जखमी

मुंढेगाव जवळ भीषण अपघात;  तीन ठार, तीन जखमी

इगतपुरी | जाकीर शेख Igatpuri

इगतपुरी तालुक्यातील Igatpuri Taluka मुंढेगाव Mundhegaon जवळ नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणारा भरधाव कंटेनर पलटी झाल्याने मोठा अपघात Accident झाला. कंटेनर पलटी होताना मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या कारवर MH 15 EB 0797 जाऊन धडकला. या अपघातात कारमधील जिल्हा परिषद शाळांचे ६ शिक्षक आणि शिक्षिका असल्याचे समजते.

दुपारी साडेचार वाजता झालेल्या ह्या अपघातात ३ शिक्षक जागीच ठार तर ३ शिक्षक शिक्षिका गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. गंभीर जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघाताची माहिती समजताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन 2 गंभीर जखमी शिक्षिकांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.

घोटी टोलनाका रुग्णवाहिकेचे १ गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान ह्या अपघातामुळे मुंढेगावजवळ मुंबईकडून येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

अपघातातील सर्वजण इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरातील समनेरे भागातील शिक्षक असल्याचे समजते. शेवंता दादू जगताप/रकीबे वय 42, गीतांजली कापडणीस – सोनवणे वय वय 42 रा. मालुंजे, नाशिक ह्या गंभीर जखमी असून धनंजय कापडणीस, रा. समनेरे, किशोर राजाराम पवार, रा. धोंगडेवाली, ज्योत्स्ना टिल्लु, रा. मालुंजे हे या अपघातात ठार झाले आहेत. या घटनेमुळे शिक्षक संघटनांमध्ये शोककळा पसरली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com