खामखेडा-पिळकोस रस्त्यावर कार उलटली
नाशिक

खामखेडा-पिळकोस रस्त्यावर कार उलटली

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

खामखेडा | वार्ताहर

समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने कारला हुलकावणी दिल्यामुळे खामखेडा-पिळकोस गावादरम्यान असलेल्या शिवाजीनगरजवळच्या वळणावर कार उलटल्याची घटना घडली.

अधिक माहिती अशी की, राज्यमार्ग क्रमांक-२७ वरील खामखेडा-पिळकोस या दोघा गावादरम्यानच्या शिवाजीनगर जवळ रात्री नऊ वाजेच्या सुमारास कळवण कडून सटाण्याच्या दिशेने कार क्रमांक एम एच ३० ए झेड ०५०८ येत होती.

कारला वळणावर समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने हुलकावणी दिली. यामुळे भरधाव असणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्याच्या कडेला उलटली.

या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. कारचालक किरकोळ जखमी असून त्यास उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com