कॅन्टोमेन्ट कर्मचाऱ्यांना दोन दिवसात मिळणार वेतन

खासदार गोडसे चा पुढाकार
कॅन्टोमेन्ट कर्मचाऱ्यांना दोन दिवसात मिळणार वेतन

देवळाली कॅम्प | Deolali Camp

येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कर्मचारी व पेन्शन धारक यांना गेल्या तीन महिन्यापासून वेतन व पेन्शन मिळत नसल्याने हतबल झालेल्या कर्मचारी यांनी काल कॅन्टोमेन्ट कार्यलयावर निदर्शने केली असता खासदार हेमंत गोडसे, युनियन प्रतिनिधी व मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार त्यांच्यात झालेल्या चर्चेनुसार येत्या ०२ दिवसात ०२ महिण्याचे वेतन व पेंशन तर जून च्या पहिल्या आठवड्यात मे महिन्याचे वेतन अदा करण्याचा निर्णय झाल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले.

तीन दिवसांपूर्वी कामगारांनी खा. गोडसे यांची भेट घेऊन करोना काळात कामगार वर्गाची वेतन व निवृत्ती वेतन या अभावें होत असलेली परवड सांगितली होती. खा गोडसे यांनी वरिष्ठ अधिकारी यांचेशी दूरध्वनी वरून चर्चा केली असता आठवड्यात हा प्रश्न मार्गि लागणार असल्याचे सांगण्यात आले होते.

दरम्यान काल मंगळवारी कर्मचारी वर्गाने कॅन्टोमेन्ट परिसरात मागण्या बाबद जोरदार घोषणा दिल्या, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांचेशी खा.गोडसे यांचे नेतृत्वाखालील शीष्टमंडलाने चर्चा केली असता, सिईओ यांनी सद्य स्थितीत बोर्डाकडे ९० लाख रुपये शिल्लक आहेत, त्यामधून ०१ महिन्याचे वेतन व निवृत्ती वेतन अदा करता येतील.

तसेच पुणे येथील कार्यलयाकडून ०२ कोटी रुपये प्राप्त होताच उर्वरीत वेतन अदा करू असे सांगितले, मात्र कामगारांना ०१ नव्हे तर ०३ महिन्याचे वेतन, बोनस, ०७ वे वेतन आयोग चा फरक हवा असल्याचा जोरदार आग्रह युनियन नेत्यांनी लावून धरला.

दरम्यान खा गोडसे यांनी दिल्ली व पुणे येथील वरिष्ठ अधिकारी यांचेशी संपर्क साधला असता ०२ कोटी रुपये तातडीने पाठीवत असुन १० कोटी रुपये आठवड्यात मिळतील असे आश्वासन मिळाले.

त्यानुसार साईओ यांनी ०२

दोन कोटी प्राप्त होताच मार्च, एप्रिल चे वेतन व पेंशन तातडीने अदा करू तर मे महिन्याचे वेतन जूनच्या पहिल्या आठवड्यात अदा करू असे सांगितले त्यामुळे कामगारांनी समाधान व्यक्त केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com