...अन् बिबट्याला वनविभागाच्या पथकाने केले जेरबंद

...अन् बिबट्याला वनविभागाच्या पथकाने केले जेरबंद

घोटी | प्रतिनिधी | Ghoti

इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) चिंचलेखैरे (गावठा) येथील एका जनावरांच्या गोठ्यात (Cattle Shed) नरभक्षक बिबट्या (Leopard) दडून बसला असून स्थानिक ग्रामस्थ भयभीत झाले आहे, असा फोन येथील एका ग्रामस्थाचा वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव यांना आला. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून बिबट्याला पकडण्यासाठी राव यांनी उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक अनिल पवार व वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांना याबाबत माहिती दिली...

...अन् बिबट्याला वनविभागाच्या पथकाने केले जेरबंद
Chhagan Bhujbal : 'हरी तुला आम्ही मरू देणार नाही, तू...'; श्रद्धांजली सभेत बोलतांना भुजबळांना अश्रू अनावर

त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी (Forest Range Officer) केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी भाऊसाहेब राव व खैरगाव वनपरिमंडळ अधिकारी पोपट डांगे यांनी प्रिती सरोदे, सुरेश चौधरी, वनरक्षक सोमनाथ जाधव, एफ. जे. सैयद, गौरव गांगुर्डे, विठ्ठल गावंडे, शरद थोरात, चिंतामण गाडर, कैलास पोटींदे, प्रकाश साळुंखे, गोरख बागुल, मालती पाडवी, मंगल धादवड, मंदा पवार, कावेरी पाटील, मनिषा सोनवणे, स्वाती लोखंडे, वैशाली पासलकर यांना इगतपुरी येथील वनविभागाच्या (Forest Department) कार्यालयात येण्यास सांगितले.

...अन् बिबट्याला वनविभागाच्या पथकाने केले जेरबंद
Video : त्र्यंबकेश्वरला भाविकांची मांदियाळी; कमला एकादशी आणि शनिवारचा साधला पर्वकाळ

यानंतर रेस्क्यू टीम लीडर थोरात यांनी सर्व रेस्क्यू टीमला (Rescue Team) सविस्तर मार्गदर्शन करत टीमचे विभाजन केले. तसेच आवश्यक असणारे साहित्य सोबत घेऊन शासकीय वाहन व खाजगी वाहन घेऊन सर्व टीम बिबट्या दडून बसलेल्या जनावरांच्या गोठ्याच्या जागेवर दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांना सविस्तर सूचना देऊन सदर गोठ्यात दडून बसलेल्या बिबट्यापासून सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

...अन् बिबट्याला वनविभागाच्या पथकाने केले जेरबंद
IND vs WI : भारत-वेस्टइंडिज यांच्यात आज चौथा टी २० सामना; भारताला मालिकेत बरोबरी साधण्याची संधी

दरम्यान, या घटनेमुळे सर्व ग्रामस्थ भयभीत झाले होते. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन राबवत गोठ्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद केले. मात्र, हे सर्व मॉकड्रील होते हे माहिती झाल्यावर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तसेच सर्व ग्रामस्थांनी सदर प्रात्यक्षिकाबाबत आनंद व्यक्त करत वनविभागाचे आभार मानले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

...अन् बिबट्याला वनविभागाच्या पथकाने केले जेरबंद
Fire News : भीषण अग्नितांडवात ६७ जणांचा होरपळून मृत्यू
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com