विजयाच्या आकडेमोडीत उमेद्वार व्यस्त

विजयाच्या आकडेमोडीत उमेद्वार व्यस्त

पुनदखोरे । संदीप जगताप Punadkhore-kalwan

कळवण (kalwan) नगरपंचायतीच्या (nagar panchayat) चौदा जागेसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान (voting) प्रक्रीया पार पडली. नगरपंचायतच्या निवडणुकीत (election) भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party), राष्ट्रीय कॉग्रेस (congress), राष्ट्रवादी कॉग्रेस (Nationalist Congress), शिवसेना (shiv sena), मनसे (MNS) याप्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवून आपले नशिब आजमविण्याचा प्रयत्न केला आहे.

नगरपंचायतीच्या स्थगित झालेल्या दोन जांगासाठी दि.18 रोजी मतदान होणार आहे. हे मतदान झाल्यानंतरच निकाल लागणार असल्यामुळे निकालासाठी साधारण महिनाभर कालावधी असुन उमेदवारांसह मतदारांना वाट पाहावी लागणार आहे. असे असले तरी शहरात विविध पक्षांचे नेते मंडळी व कार्यकर्ते विजयाचे गणित आखत आहे.

मतदान झाल्याबरोबर शहरात ज्या पध्दतीने उमेदवारांनी निवडणुक लढविली आहे. त्यानुसार आपआपल्या कार्यकर्त्यासोबत बैठक घेऊन आपणास किती मतदान झाले असेल त्याचा अंदाज घेतला जात आहे. प्रत्येक प्रभागातील कोणत्या भागातून आपणास किती मतदान झाले असेल याचा पण अंदाज नेते मंडळी तसेच कार्यकर्ते घेत आहे. विविध ठिकाणी वैयक्तीक तसेच फोनव्दारे संपर्क करून परीस्थितीचा आढावा घेत आहे.

मतदान संपल्यापासून ते आजपावोत मतदानाविषयी सर्वच पक्षांचे कार्यकर्ते याबाबतीत विचारत आहेत. पंरतू मतदार राजा सर्वानाच विश्वास देऊन आम्ही तुम्हालाच मदत केली असुन विजय आपलाच आहे. असे सांगत असल्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे आपणास कीती मतदान झाले असेल याचा अंदाज बांधणे कठीण होत आहे. मतमोजणीला (Counting of votes) बराच कालावधी असल्यामुळे सर्वच उमेदवारांना निकालाची वाट पाहावी लागणार आहे हे नक्कीच.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com