
वलखेड । वार्ताहर | Valkhed
निष्ठावंत शिवसैनिकांना (Shivsainik) आगामी निवडणुकीत (election) उमेदवारी (Candidacy) देण्यात येणार आहे.
त्यामुळे शिवसैनिकांनी कामाला लागावे’, असे प्रतिपादन दिंडोरी लोकसभेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे (Dindori Lok Sabha Liaison Chief Jayant Dinde) यांनी केले. दिंडोरी (dindori) येथे शिवसेनेच्या (shiv sena) वतीने संवाद दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जयंत दिंडे बोलत होते.
दिंडोरी लोकसभेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे व जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या संवाद दौर्यात आगामी जिल्हा परिषद (zilha parishad), पंचायत समिती (panchayat samiti), नगरपरिषद (nagar parishad) या निवडणुकांविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. निवडणूकीमध्ये इच्छुक असणार्या शिवसैनिकांची यावेळी मते जाणून घेण्यात आली. जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, बुथप्रमुख, गटप्रमुख यांना शिवसेनेच्या कामाची पद्धत यावेळी ठरवून देण्यात आली. प्रामाणिक शिवसैनिकांनाच उमेदवारी दिली जाईल. कोणत्याही शिवसैनिकांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असे लोकसभेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख सुनील पाटील, माजी आमदार धनराज महाले, सहकार नेते सुरेश ढोकळे, उपजिल्हाप्रमुख नाना मोरे, विलास निरगुडे, उपजिल्हा संघटक सतीश देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. लोकसभेचे संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच या ठिकाणी आलेले जयंत दिंडे यांचा दिंडोरी तालुक्याच्या (dindori taluka) वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे यांनी मानले.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, माजी जिल्हा परिषद गटनेते प्रवीण जाधव, महिला तालुकाप्रमुख अस्मिता जोंधळे, नारायण राजगुरु, उपतालुकाप्रमुख विश्वास गोजरे, अविनाश वाघ, रावसाहेब जाधव, रघुनाथ आहेर, विजय पिंगळ, सुनील मातेरे, संतोष मुरकुटे, युवा जिल्हाप्रमुख नदीम सय्यद, संगम देशमुख, किरण कावळे, निलेश शिंदे, विठ्ठल अपसुंदे, किशोर कदम, डॉ. विलास देशमुख, उत्तम जाधव, शिवराज गोडसे, जगन सताळे, प्रदीप देशमुख, सोनू देशमुख, पप्पू शिवले, मालती खराटे,
बाळू निसाळ, नंदू बोंबले, जयराम डोखळे, गणेश हिरे, सुनील जाधव, उज्वला बोराडे, किशोर शिंदे, अरुण कड, योगेश निखाडे, भाऊराव शिंदे, शिवाजी शार्दुल, जगन सताळे, प्रदीप देशमुख, राजेंद्र जाधव, सोनू देशमुख, वैभव महाले, संदीप जाधव, दीपक जाधव, दशरथ खराटे, शेखर कांबळे, शांताराम भोई, रवी गायकवाड, विलास केदार, धनंजय जाधव, समाधान जाधव, महेश फुकट, सोमनाथ निंबेकर, रवींद्र मोरे, संजय धात्रक, मोहन जाधव आदींसह शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.