न्यायालयामार्फत वारस दाखल्याची सक्ती रद्द करा

तालुका भाजपतर्फे तहसीलदारांना निवेदन
न्यायालयामार्फत वारस दाखल्याची सक्ती रद्द करा

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

न्यायालयामार्फत वारस दाखला आणण्याची अन्यायकारक सक्ती रद्द करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन (agitation) करण्यात येईल, असा इशारा तालुका भाजपतर्फे (bjp) तहसीलदार (Tehsildar) यांना निवेदन (memorandam) देत देण्यात आला आहे.

तालुका भाजपाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात तालुक्यात वारसांची नोंद करण्यासाठी न्यायालयामार्फत वारस दाखला (Heir certificate) आणण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. यापूर्वी या नोंद नोटरी (Notary) व स्थानिक पंचनामा (panchnama) करून करण्यात येत होती. न्यायालयामार्फत वारस दाखला आणण्यासाठी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागत असून खर्चही मोठ्या प्रमाणात होत आहे.

सर्वसामान्य जनतेस हा खर्च परवडणारा नाही व त्यासाठी वेळही खूप जास्त लागत आहे या सक्तीमुळे जनता त्रस्त झालेली असून जनतेस तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. या आदेशाबाबत चौकशी केली असता शासनाचा कोणताही आदेश पारित झालेला नाही तसेच सदर सक्ती फक्त नांदगाव तालुक्यामध्येच (Nandgaon taluka) केली जात आहे ते तरी न्यायालयामार्फत वारस दाखला आणण्याची अन्यायकारक सक्ती करू नये.

सर्वच नोंदी पूर्वीप्रमाणे नोटरी व स्थानिक पंचनामा गृहीत धरून करण्यात याव्यात याबाबतचा तात्काळ निर्णय घेण्यात यावा अन्यथा नांदगाव तालुका भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल असे निवेदनात शेवटी म्हटले आहे. निवेदनावर भाजप ज्येष्ठनेत्या जयश्री दौंड, जिल्हा उपाध्यक्ष भाऊराव निकम, तालुकाध्यक्ष बापू जाधव, राजेंद्र पवार, शहराध्यक्ष उमेश उगले, अक्षदा कुलकर्णी, प्रकाश थोरात, दत्तात्रय काळे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Related Stories

No stories found.