
दिंडोरी । संदिप गुंजाळ | Dindori
गोरगरीब व आदिवासी समाजाच्या (tribal community) उद्धारासाठी शासनाकडून भरमसाठ निधीची (fund) तरतूद करण्यात येते. तो निधी आवश्यक कामासाठी वापरुन निधी योग्य योग्य त्या ठिकाणी वापरून
त्याचा सदुपयोग करण्यापेक्षा त्या निधीतून आपला कसा फायदा होईल याकडे अधिक लक्ष दिले जात असल्याचे चित्र दिसत असल्याची शोकांतिका आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू असणार्या आदिवासी आश्रमशाळेचे चित्र तर अतिशय विदारक आहे असेच म्हणावे लागेल. शिक्षकांच्या (teachers) हलगर्जीपणामुळे एका निष्पाप अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) जोपूळ येथील आश्रमशाळेत झाला.
त्यावर अधिक्षक, मुख्याध्यापक व वर्गशिक्षक यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. परंतु यास संस्थेला देखील तितकेच जबाबदार धरत संबंधित संस्थेची मान्यता रद्द करण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परीषदेच्या (All India Tribal Development Council) वतीने आदिवासी विकास विभागाच्या (Tribal Development Department) अप्पर आयुक्तांकडे (Upper Commissioner) केली असून आयुक्त काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) जोपूळ येथील आश्रमशाळेतील सहावीत शिकणार्या 11 वर्षीय आदिवासी विद्यार्थ्याचा (students) मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. पेठ (peth) सारख्या आदिवासी तालुक्यातील सावर्णा येथील एका अंत्यत गरीब कुटुंबातील मुलगा संकेत ज्ञानेश्वर गालट (11) हा दिंडोरी तालुक्यातील जोपुळ येथील यशवंतराव पाटील एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा येथील शाळेमध्ये इयत्ता सहावी मध्ये शिक्षण (education) घेत होता.
या विद्यार्थ्याचा हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (Department of Public Health) वतीने राज्यभरात सध्या जागृत पालक सुदृढ बालक अभियान सुरू असुन या आरोग्य तपासणी दरम्यानच शालेय विद्यार्थाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. 13 फेब्रुवारी रोजी किरकोळ खोकला व घसा दुखत असल्याने ज्ञानेश्वरला तेथील शिक्षकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र खेडगाव (Primary Health Center Khedgaon) या ठिकाणी उपचाराकरीता नेले होते.
त्यानंतर हा मुलगा आश्रम शाळेच्या निवासी वसतिगृहाच्या ठिकाणी मुक्कामी असताना त्यास दिनांक 16 फेब्रुवारी रोजी पोट दुखत असल्याने शिक्षकांनी खेडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी पुढील उपचाराकरिता जिल्हा रुग्णालय नाशिक येथे नेण्यास सांगितले. त्यावेळी संकेत गालट याचे बरोबर असलेले शिक्षक यांनी त्यास पिंपळगाव बसवंत येथील खाजगी रुग्णालय राधाकृष्ण हॉस्पिटल येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी देखील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन जाणेबाबत सूचना केली.
त्यानंतर पिंपळगाव बसवंत येथील ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी नेले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी या मुलास मृत झाल्याचे घोषित केले. त्यानंतर मयत मुलाचे नातेवाईकांना कळविण्यात आले. जिल्हा रुग्णालय नाशिक येथे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतर विद्यार्थाच्या मृत्युने कारण स्पष्ट होईल. दरम्यान आश्रम शाळेतील तीन कर्मचार्यांवर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल संस्था स्तरावर निलंबित करण्यात आले.
तसेच पालकाच्या तक्रारीनुसार या विद्यार्थ्यांचा मृत्यू दि. 16 रोजी सकाळी दहा वाजता झाला असतांना संबंधित पालकांना दुपारी साडेबारा वाजता कळवल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी असतांना व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आपणास खासगी शाळेतील कर्मचार्यांच्या सेवाशर्ती नियमानुसार निलंबित करण्यात आले आहे. यात मुख्याध्यापिका संध्या भास्कर साखरे, शिक्षक भरत रमाकांत गुळवे व अधिक्षक एकनाथ दाजी भामरे यांचे निलंबन करण्यात आली आहे.
यात संस्था देखील तितकीच जबाबदार असून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतिने लकी जाधव व गणेश गवळी यांनी सदरील आश्रमशाळेची मान्यता रद्द करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. आदिवासी विभागाच्या वतीने कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.