कळवण
कळवण
नाशिक

कळवण : सुळेपाडा येथे कालवा फुटला

Gokul Pawar

Gokul Pawar

पाळे खुर्द । Pale

कळवण तालुक्यातील अर्जुन सागर धरणाचा उजवा कालवा सुळेपाडा येथे फुटला असल्याने पाणी रस्त्याने वाहत आहे.परिसरातुन जाणार्‍या शेतकर्‍यांना रस्ता नसल्याने हाल होत आहे. कालव्याला पाणी प्रमाणाच्या पेक्षा जास्त पाणी सोडल्याने कालवा पुर्णपणे फुटुन मोकळा झाला.

पुर्ण कालवा फुल भरुन वाहत असल्याने पाणी ओहरफुल्ल झाले व पाणी ओेसंडुन वाहत आहे. माती वाहुन गेल्यावर बांध तुटला आहे. पाण्याचा प्रवाह वेगाने वाहत आहे. त्यांमुळे पाणी कालव्यात राहणार नाही.शेतकर्‍यांच्या शेतीचेही नुकसान होणार आहे.

वाहतुकीस अडथळा झाल्याने अनेक प्रवाशांचा व शेतकर्‍यांचा वेळ वाया जात आहे. येथे तातडीने ल.पा. विभागाने लक्ष देऊन शेतकर्‍यांचे होणारे नुकसान थांबवुन वाहतुंकही सुरळीत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com