आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांकरिता कॅम्पस भरती

आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांकरिता कॅम्पस भरती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक (nashik) आणि महिंद्रा अँन्ड महिंद्रा लि. (Mahindra & Mahindra Ltd.), सातपूर (satpur) यांचे संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.14) आयटीआय (ITI) उत्तीर्ण उमेदवारांकरिता कॅम्पस भरतीचे (Campus Recruitment) आयोजन करण्यात आले आहे.

सोमवारी (दि.14) जिल्ह्यातील महिंद्रा अँन्ड महिंद्रा लि. सातपूर या नामांकीत कंपनीत आयटीआय (ITI) प्रशिक्षीत वेल्डर (Welder), फिटर (fitter), डिझल मॅकेनिक (Diesel Mechanic), मोटर मशिन व्हेईकल (Motor Machine Vehicle) शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांची 150 पदांसाठी कॅम्पस भरतीमधुन मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

या कॅम्पस भरतीचे (Campus Recruitment) आयोजन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक (District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre, Nashik), प्रगत व्यवसाय प्रशिक्षण पध्दती इमारत, पहिला मजला, आयटीआय सातपूर परिसर, त्र्यंबक रोड, नाशिक या ठिकाणी सोमवारी (दि.14)सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील आयटीआय (ITI) उत्तीर्ण उमेदवारांनी सदर सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com