भीक मागणाऱ्या मुलामुलींच्या पुनर्वसनासाठी मोहीम

भीक मागणाऱ्या मुलामुलींच्या पुनर्वसनासाठी मोहीम

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्हा महिला बालविकास समिती (District Women Child Development Committee ) व नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या (Nashik Police Commissionerate) संयुक्त विद्यमाने नाशिक शहरात विविध ठिकाणी रस्त्यावर व सिंग्नलवर भिक मागणाऱ्या ३६ अल्पवयीन मुलामुलींना ताब्यात घेऊन त्यातील १४ मुलामुलींना पुनर्वसनासाठी बालगृहात पाठविण्यात आले.

सध्या नाशिक शहरात विविध ठिकाणी रस्त्यावर अल्पवयीन मुले व मुली भिक मागतांना दिसून येत असल्याने संबंधित मुलामुलींचे पुनर्वसन होण्याकरिता चाईल्ड हेल्प लाईन व नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे संयुक्तिक मोहीम राबवून शहरातील विवीध भागातील सिग्नल,उड्डाणपुला खालील परिसर आदी ठिकाणाहून अठरा वर्षाच्या खालील भिक मागणाऱ्या तब्बल ३६ मुलांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांची वैद्यकीय तपासणी करून जिल्हा बाल समितीसमोर हजर करून त्यातील काहींचे पालक आल्याने त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यानंतर पुन्हा सदरहू मुलांना भिक मागण्यास लावू नये व तसे केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल अशी समज देऊन त्यांच्या मुलांना ताब्यात देण्यात आले.तर १४ मुलांना पुनर्वसनासाठी बालगृहात पाठविण्यात आले.

ही मोहीम महिला सुरक्षा विभाग भरोसा कक्ष व.पो.नि. ज्योती आमणे,सपोनी संगीता गावीत,आशा सोनवणे,लिला सुकटे,मालू राऊत,मनीषा जाधव,आदींसह आयुक्तालयाच्या हद्दीतील महिला पोलीस व अंमलदार ,महिला बालकल्याण अधिकारी व सदस्यांनी यशस्वीरित्या राबविली.

Related Stories

No stories found.