पिंपळगाव ग्रामपंचायतीची थकबाकी वसुलीची मोहीम

पिंपळगाव ग्रामपंचायतीची थकबाकी वसुलीची मोहीम

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी Pimpalgaon Basvant

पिंपळगाव ग्रामपंचयतीच्या Grampanchayat - Pimpalgaon कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणचे टपरी जागाभाडे व व्यापारी संकुलातील गाळे धारकांकडून ग्रामपंचायतीचा नियोजित कर Gram Panchayat tax आर्थिक वर्षात न भरल्याने ग्रामपंचायतीने कर वसुलीसाठी recovery of arrears टपरीधारक व व्यापारी संकुलातील गाळेधारकांचे विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे.

या कारवाईमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाल्याने व्यवसायिकांनी अवघ्या दोन तासात साडे चार लाख रुपयांची थकबाकी जमा केली आहे. दरम्यान थकबाकी जमा झाल्यानंतर संबंधितांची दुकाने उघडण्यास प्रशासनाने परवानगी दिली.

गेल्या आर्थिक वर्षातील थकित कर वसुलीसाठी ग्रामपंचायत प्रशासनाने थकबाकीदार व्यवसायिकांना सातत्याने स्मरणपत्रे, नोटिसा दिल्या. त्याचप्रमाणे पाच टक्क्यांची सवलत योजना राबवली. तसेच वेळोवेळी ध्वनिक्षेपकावरून थकबाकीदार व्यवसायिकांना जाहीर आवाहन करूनही काही व्यवसायिक वर्गाकडून कर भरण्याबाबत दिरंगाई होत होती.

ग्रामपंचायत प्रशासनापुढे कर वसुलीसाठी 96 लाख रुपयांचे आसपास उद्दीष्ट असताना केवळ 50 टक्केच कर वसुली झाली. त्यामुळे प्रशासनासमोर थकित करवसुली करणे एक आव्हान होते. गेल्या दीड दोन वर्षाच्या करोना पार्श्वभूमीवर शहरातील व्यवहार पार ठप्प झाले होते. त्या

मुळे व्यापारी वर्गासमोर उत्पन्नाच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. गेल्या काही महिन्यापासून दैनंदिन व्यवहार सुरळीत झाल्याने कर वसुलीसाठी ग्रामपंचायत प्रशासनाने वेळोवेळी सवळत देऊनही फारसा प्रतिसाद न मिळाल्याने या आठवड्यात संबंधितांना रितसर नोटिसा देऊन थकित कर भरण्याचे आवाहन केले होते. परिणामी काही व्यापार्‍यांनी थकीत रक्कम भरणा केली.

परंतु अद्यापही कराची मोठी रक्कम थकित असल्याने टपरी आणि गाळ्यांना थकबाकीच्या नोटिसा लावून निफाड फाटा परिसरातील सात गाळे सीलबंद करण्यात आले. ग्रामपंचायत प्रशासनासमोर साधारणत: 1 कोटी रुपयांचे आसपास उद्दीष्ट असताना 50 टक्क्यापर्यंत करवसुली जमा झाल्याचे समजते. ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्यानेच थकित रक्कम वसुलीत वाढ झाली. मात्र असे असले तरी अद्यापही उपनगरातील घर मालकांकडे घरपट्टी व पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात थकित आहे.

भविष्यात थकित कर वसुलीसंदर्भात अशाच धडक कारवाईचे संकेत ग्रामपंचायत प्रशासनाकडून दिले आहेत. तरी कोणत्याही कटू कारवाईला सामोरे जाण्याची वेळ व्यवसायिक व घरमालकांवर येवू नये यासाठी आपल्याकडील थकित कराची रक्कम तत्काळ ग्रामपंचायत कार्यालयात भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायत सरपंच अलका बनकर, उपसरपंच कडाळे, ग्रामविकास अधिकारी एल.जे. जमंग आदींसह ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com