
नाशिक | प्रतिनिधी Nashik
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे (आयुष्यमान भारत) (Ayushman Bharat) गोल्डन कार्ड काढल्यास विविध १२०९ प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रियांचा यामध्ये समावेश आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना पाच लाख रुपये प्रती वर्ष प्रती कुटुंब वैद्यकीय (medical) संरक्षण मिळते.
या योजनेअंतर्गत शासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीतील पात्र लाभार्थीं यांना गोल्डन कार्ड तयार करण्यासाठी यापुर्वीही नाशिक महानगरपालिका (NMC) मार्फत वेळोवेळी जाहीर आवाहन करूनही अद्यापावेतो बहुसंख्य पात्र लाभार्थी यांनी गोल्डन कार्ड काढून घेतलेले नाहीत.सदर योजनेच्या पात्र लाभार्थींची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्याचबरोबर मनपा अंतर्गत असणाऱ्या सर्व रुग्णालयांमध्ये यादी उपलब्ध आहे. यादीमधील पात्र लाभार्थी यांनी शिधापत्रिका, प्रधानमंत्री पत्र, आधारकार्ड या कागदपत्र सोबत आणून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत अंगीकृत सर्व खाजगी रुग्णालये त्याचबरोबर जिल्हा रुग्णालय व नाशिक महानगरपालिकेचे सर्व रुग्णालय, शहरी आरोग्य प्राथमिक केंद्र (primary health) या ठिकाणी संपर्क करून गोल्डन कार्ड तयार करून घेऊ शकतात
महानगरपालिकेच्या वतीने पात्र नागरिकांंना गोल्डन कार्ड काढण्यासाठी शहराच्या सर्व विभागांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार पात्र लाभार्थी यांनी नजीकच्या शिबिरांमध्ये सहभागी होऊन कुटुंबाचे गोल्डन कार्ड तयार करून घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (chandrakant pulkundwar) आणि वैद्यकीय (आरोग्य) अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.