कॉल करा, अन मोफत फवारणी करून घ्या !

नवीन नाशकात उपक्रम
कॉल करा, अन मोफत फवारणी करून घ्या !

नविन नाशिक । Nashik

प्रतिबंधित क्षेत्रात निर्जंतुकीकरण करण्यासाठी फोन करा, फवारणी करा असा उपक्रम सध्या किरण गाडे यांनी हाती घेतला आहे. त्याचे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

भारतीय जनता पार्टी व नई उमंग फाउंडेशन तर्फे नवीन नाशकात गेल्या पंधरा दिवसांपासून करोना बाधित रुग्ण व आसपासच्या परिसरात मोफत निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नवीन नाशकात रुग्ण संख्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे लक्षात येत आहे.

सामाजिक कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी गाडे तसेच नवी उमंग फाउंडेशनच्या वतीने मोफत निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 25 मधील अभियंता नगर, कामटवाडे, अंबिकानगर, कोकण भवन, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करोना रुग्ण आढळून आल्याने सामाजिक बांधिलकी जोपासत किरण गाडे यांनी स्वखर्चाने सहकार्‍यांना सोबत घेत बाधित रुग्णांचे घर व परिसरात तसेच बिल्डींग मध्ये नियमित मोफत सॅनिटायझर फवारणी तसेच निर्जंतुकीकरण फवारणी सुरू केली आहे.

तसेच संपूर्ण परिसरामध्ये करोना बाबत घ्यावयाची काळजी तसेच नियमावलीचे परिपत्रक घराघरात पोहोचवून जनजागृती करत आहे. मोफत फवारणीसाठी परिपत्रकात संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून संपूर्ण प्रभागात हा उपक्रम सुरू असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com