बिबट्याचे जीवघेणे हल्ले सुरूच! चिंचपाड्यात वासरू ठार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

File Photo
File Photo

सुरगाणा | प्रतिनिधी

सुरगाणा तालुक्यातील चिंचपाडा येथे बिबट्याने हल्ला करून 3 वर्षीचे गाईचे वासरू चावा घेतल्याने जागीच ठार झाले. चिंचपाडा येथील रहिवासी संतोष रामदास पगार हा आपल्या घरी आपल्या गोठ्यामध्ये दोन बैल एक गाय व एक गाईचे वासरू रोजच पडवीत बांधत असत. रात्री दहाच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून गाईच्या पिल्लाला जागीच ठार केले. हि घटना रामदास पगार याना सकाळी बैल सोडायला गेला असता लक्षात आली.

File Photo
अखेर ठरलं! जुलै महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार... कुणाचा समावेश, कुणाला डच्चू?

या भागात नेहमीच बिबट्याचे हल्ले होत असतात. रोजच बिबटे गावात येतात. परिसरातील गावांमध्ये अशा घटना दररोजच ऐकायला मिळत असत. कोंबडी, बकरीवर हल्ला करणे ह्या घटना जवळील गावामध्ये होत असता. तालुक्यात अशा घटना अनेक वेळा झाल्या आहेत. काही महिन्यापुर्वी दोन बक-या व एक बोकड बिबट्याने फस्त केला आहे. दहा ते बारा वर्षांपुर्वी एका आठ वर्षीय मुलीला बिबट्याने अंगणातून उचलून नेले होते. त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सुरगाणा तालुका हा डोंगराळ व अतिदुर्गम, खोल दरी, जंगलव्याप्त भाग असून गुजरात सीमावर्ती डांग जिल्ह्यातील राखीव वनक्षेत्रास लगतचा आहे. या खोऱ्यात जंगल असल्याने रोजच या भागात बिबट्याचे दर्शन होते. रोजच सात ते आठ वाजेच्या सुमारास बिबट्याच्या डरकाळीचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे या भागातील आदिवासी बांधवांना त्याची सवय झाली आहे. काही जण वनपट्यात रहात होते ते आता भीती पोटी आपल्या जनावरांसह गावात रहायला आले आहेत.

रात्री तर रोजच कोणाला तरी गावाच्या आसपास बिबट्याचे दर्शन आम्हाला होत असते. त्यामुळे बिबट्या दिसला तर आम्हाला काही त्याचे नवल अपुरुप वाटत नाही. आम्हांला पण वन्यजीवां शिवाय करमत नाही. मात्र जिवितहानी झाली तर शासनाने नुकसान भरपाई द्यावी एवढीच माफक अपेक्षा ग्रामस्थांनी बोलताना व्यक्त केली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com