गंगापूर शिवारात बिबट्याचा उपद्रव

गंगापूर शिवारात बिबट्याचा उपद्रव

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

नाशिक महानगरपालिका (Nashik NMC) प्रभाग क्र. 9 (Ward No 9) गंगापूर शिवार (Gangapur Shivar) शिंदोरी रोड भागात बिबट्याने (Leopard) उपद्रव मांडला आहे...

गेल्या दोन दिवसात गाय, वासरु व कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील यांनी वनखात्यांच्या (Forest Department) अधिकार्‍यांसमवेत नागरिकांची भेट घेतली. याठिकाणी तातडीने पिंजरा लावण्यात आला आहे.

प्रभाग क्र. 9 गंगापूर शिवार शिंदोरी रोड भागात बिबट्याने स्थानिक रहिवासी दामू पाटील यांच्या गायीचे वासरावर हल्ला करुन त्यास ठार केले. त्यापाठोपाठ दूसर्‍या दिवशी संत तुकाराम महाराज क्रीडांगण पाठीमागे शिंदोरी रस्त्याच्या लगत शेतकरी सोमनाथ पाटील यांच्या कुत्र्यावर हल्ला करुन त्यालादेखील जखमी केले.

या घटनांमुळे परिसरातील शेतकरी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण होते. युवानेते अमोल पाटील यांनी वनखात्याचे वरिष्ठ अधिकारी भदान यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून मध्यरात्री वनखात्याच्या पथकाला घटनास्थळी पाचारण केले. या परिसरात बिबट्या पकडण्याकरीता तातडीने पिंजरा लावण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com