सीए इन्स्टिट्यूट नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी सीए राकेश परदेशी

सीए इन्स्टिट्यूट नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी सीए राकेश परदेशी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट ऑफ़ इंडिया (The Institute of Chartered Accountants of India) च्या नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी सीए राकेश परदेशी (CA Rakesh Pardeshi as President) यांची बिनविरोध निवड (Uncontested choice) करण्यात आली.

सन 2022 ते25 या कालावधीच्या कार्यकारणी करीता सीए इन्स्टिट्यूटच्या आयसीए आय भवन (ICAI Bhavan) येथे निवडणूक (election) जानेवारी 2022 मध्ये घेण्यात आली होती. यात निवडून आलेल्या सदस्यांमधून सन 2023 2024 करीता सीए राकेश परदेशी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदी सीए संजीवन तांबूळवाडीकर, सचिवपदी सीए जितेंद्र फाफट, खजिनदार पदी सीए अभिजित मोदी यांची निवड करण्यात आली.

तर सीए मनोज तांबे यांची विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली व सी ए विशाल वाणी यांची विध्यार्थी शाखेचे सह सभासद म्हणून नेमणूक करण्यात आली. वेळी कार्यकारणीचे मावळते अध्यक्ष सीए सोहिल शाह व पश्चिम विभागीय प्रादेशिक परिषद सदस्य सीए पियुष चांडक उपस्थित होते.

यावेळी उपस्थित कार्यकारणी सदस्यानी नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे स्वागत केले. याच बरोबर मावळते अध्यक्ष सीए सोहिल शाह यानी आपल्या पदाचा पदभार नवनिर्वाचित कार्यकारणीस सोपविला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com