जुलै अखेर करोना रुग्णांचा आकडा १० हजारापर्यंत  जाण्याची शक्यता
नाशिक

जुलै अखेर करोना रुग्णांचा आकडा १० हजारापर्यंत जाण्याची शक्यता

शासकीय यंत्रणांचा अंदाज

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शासकिय यंत्रणांकडुन जुलै महिन्यात करोना रुग्णांचा आकडा ४ हजारपर्यत जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र रुग्णांचा चार हजाराचा आकडा १२ जुलै रोजी झाला होता. गुरुवारी शहरातील रुग्णांचा आकडा पाच हंजाराच्या जवळ पोहचला असुन प्रति दिन बाधीतांचा आकडा पाऊणे दोनशेच्या आसपास असल्याने जुलै अखेर करोना रुग्णांचा आकडा १० हजारापर्यत जाण्याची शक्यता शासनाकडुन वर्तविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता खाटा सज्ज ठेवण्याचे काम महापालिका प्रशासनाकडुन सुरू झाले आहे.

गेल्या जुन महिना अखेरीस शहरातील करोना रुग्णांचा आकडा २०८० इतका होता. यावेळी शासनाकडुन नाशिक शहरात जुलै महिन्यात रुग्णांचा आकडा दुप्पट म्हणजे चार हजारापर्यत जाईल अशी शक्यता वर्तविण्यात आली होता. मात्र करोना प्रादुर्भावाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढुन जुलै महिन्याच्या पंंधरा दिवसात नवीन २ हजार ५६१ रुग्णांची भर पडली असुन रुग्णांचा आकडा ५ हजारांच्या जवळ आला आहे. या वाढत्या संसर्गामुळे महापालिका व आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

गुरुवार (दि.१६) पर्यत शहरातील रुग्ण संख्या ४ हजार ८७० इतकी झाली असुन मृतांचा आकडा १९३ पर्यत गेला असुन पाच जणांचा करोनामुळे मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. शहरात नवीन रुग्णांची वाढ होत असुन आता करोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाकडुन कडक उपाय योजना केल्या जात असुन शहरातील काही भागातील रस्ते बंद करण्यात आले आहे. तसेच आत्तापर्यत शहरात ३ हजार ९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. यात गुरुवारी देखील १३८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असुन आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले वाढले आहे.

आता शहरातील रुग्णांचा आकडा ४८७० आणि मृतांचा आकडा १९३ पर्यत गेला आहे. शहरातील जुने नाशिक परिसर, पेठरोड - दिंडोरीरोड भागातील झोपडपट्टी, वाल्मीकनगर नवीन नाशिक, नाशिकरोड परिसरात वाढते रुग्णांची संख्या वाढतच असल्याने याभागावर महापालिकेकडुन लक्ष केंद्रीत केले आहे. शहरात गुरुवारी (दि.१६) १९३ अशी नवीन रुग्णांची भर पडली आहे. यात ४५ वर्षीय पुरुष रा. शांतीपार्क श्रीमान अपार्टमेंट नाशिक, ५५ वर्षीय महिला रा. सैलानीबाबा रोड जेलरोड, ६४ वर्षीय पुरुष रा. पाचवी स्कीम उत्तमनगर नवीन नाशिक, ९४ वर्षीय पुरुष रा. महात्मानगर नाशिक व ७२ वर्षीय महिला रा. मदीना हौसिंग सोसायटी जुने नाशिक यांचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com