द्राक्षबागांवर कुर्‍हाड पण का ?

द्राक्षबागांवर कुर्‍हाड पण का ?

कसबे सुकेणे | वार्ताहर Kasbe Sukene

मौजे सुकेणे (kasbe sukene) व परिसरात चालू वर्षी अनेक द्राक्षबागांवर (Grapes farm) शेतकर्‍यांकडून (farmers) कुर्‍हाड चालवली जात असून काळी जातीच्या द्राक्षबागा तोडण्याचे मोठे प्रमाण सुकेणे व परिसरात दिसून येत आहे.

सुकेणा परिसरात काळी जातीच्या शरद सीडलेस, फ्लेम (flame), काळी सोनाका, नानासाहेब पर्पल, मामा जंबो, जम्बो आदी जातीच्या द्राक्षबागा मोठ्या प्रमाणात असून चालू वर्षी मात्र बदलत्या हवामानाचा मोठा फटका या द्राक्षबागांना बसला आहे. द्राक्षबागा फेल गेल्याने त्या तोडण्याचा दुदैवी निर्णय द्राक्ष बागायतदारांना घ्यावा लागत आहे. मागील दोन वर्ष करोनाचे सावट असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत होता.

त्यातच चालू वर्षी पुन्हा द्राक्षबागा फेल गेल्याने आर्थिक तोटा (financial loss) वाढत गेला. द्राक्षबागांचा खर्च मात्र मोठ्या प्रमाणात वाढतच आहे. वाढती मजुरी, रासायनिक खतांच्या (Chemical fertilizers) प्रचंड किमती, महागडी औषधे या सर्व गोष्टींमुळे द्राक्ष बागायतदार चिंतेत असून उत्पादनापेक्षा खर्च परवडत नसल्याने द्राक्षबागा तोडल्या जात आहे. द्राक्षबागांकडे वर्षभराचे पीक म्हणून पाहिले जाते.

एक वर्ष द्राक्ष बाग फेल गेल्यानंतर दोन वर्ष शेतकर्‍यांचे वाया जातात. खर्च मात्र आहे तोच राहत असून उत्पादन शून्य होत असल्याने शेतकरी द्राक्षबागा तोडू लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com