नाशकात चाललंय तरी काय? व्यापाऱ्यास मारहाण करत लुटले सात लाख

नाशकात चाललंय तरी काय? व्यापाऱ्यास मारहाण करत लुटले सात लाख

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

चार जणांच्या टोळक्याने व्यापाऱ्याला मारहाण (Businessman Beaten by four criminals) करून त्यांच्याजवळील ७ लाख १० हजारांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाणे (Upanagar Police Station) चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, अंकुश प्रकाश शिरसाट (Ankush Shirsat) (रा. शिवनेरी बंगला राजे संभाजीनगर पारेगाव रोड येवला) हे नाशिकरोड महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोरून आपल्या वाहनातून जात होते.

त्यावेळी चार जणांच्या अज्ञात टोळक्याने त्यांना अडविले व शिवीगाळ व दमदाटी करून हॉकी स्टिक, लोखंडी रॉड, लाकडी बॅटने मारहाण केली. तसेच त्यांच्याजवळ असलेली बॅग व त्यामध्ये असलेले ५ लाख रुपये रोख व ७ तोळे वजनाची २ लाख १० हजार किमतीची सोन्याची चेन चोरून नेली.

तसेच गाडीचा ड्राइवर राजू मोरे (Raju More) यास मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान, शिरसाट यांनी उपनगर पोलीस स्टेशन गाठले व तक्रार दाखल केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com