नाशिक । प्रतिनिधी Nashik

व्यवसाय हीसुद्धा ईश्वराची सेवा आहे, असे मी मानते. कारण व्यवसायामुळे अनेक जणांना रोजगार उपलब्ध होतो व त्यांचा चरितार्थ चालतो. स्त्री एका जीवाला जन्माला घालू शकते तर ती काहीही करू शकते; इतकी अफाट क्षमता तिच्यात असते.

एकोणिसाव्या व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात उद्योगधंद्यांत स्त्रियांचा वाटा अत्यंत अल्प होता. मात्र विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी स्त्रियांचा औद्योगिक क्षेत्रातील सहभाग अत्यंत वेगाने वाढल्याचे दिसते. सध्या सर्वच क्षेत्रांत स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत.

औद्योगिक क्षेत्रातही त्या मागे नाहीत. अनेक स्त्रिया उद्योजक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.अथर्व कॉस्मेटिक्स अँड प्रायव्हेट लिमिटेड या सौंदर्य प्रसाधनांची उत्पादने करणार्या नामवंत कंपनीच्या संचालक राजश्री पाटसकर त्यापैकीच एक ! सौंदर्य हा स्त्रियांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. सौंदर्य म्हटले की सौंदर्यप्रसाधने आलीच. व्यक्तीचे सौंदर्य व मोहकता वाढवणे आणि सर्वसाधारणपणे व्यक्तिमत्त्वात सुधारणा करणे यासाठी सौंदर्यप्रसाधने महत्वपूर्ण भूमिका निभावतात.

राजश्री यांचे प्राथमिक शिक्षण भुसावळ येथे झाले. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठात एम.फार्म.चे उच्चशिक्षण पूर्ण केले. नंतर मइंटरनॅशनल मार्केटिंगमध्ये एमबीएची पदवी देखील त्यांनी घेतली. तसेच सद्ध्या त्या पीएचडी करत आहे. राजश्री यांना लहानपणापूनच वाचनाची अत्यंत आवड होती. शालेय जीवनात असतानाच मबिजनेस महाराजेफ नावाचे पुस्तक त्यांनी वाचले तेव्हाच आपण उद्योजक व्हायचे हा दृढनिश्चय त्यांनी केला. एम.फार्म.ची पदवी घेतल्यानंतर मेडिसिनचे उत्पादन अनेक जण करतात, असे त्यांच्या लक्षात आले.

मात्र कॉस्मेटिक्समध्ये वेगळे काहीतरी करावे, असे त्यांना वाटले. देशात आज अनेक परदेशी कंपन्यांचे कॉस्मेटिक्स उपलब्ध आहे. मात्र ते कॉस्मेटिक्स त्या-त्या प्रदेशातील वातावरणाला अनुकूल होतील, यादृष्टीने त्यांची निर्मिती केली जाते. आपल्या देशात पाश्चात्य व इतर देशांपेक्षा वातावरण वेगळे असल्याने येथील वातावरणाला अनुसरून त्यांनी ही उत्पादने बनवली आहेत. सुरुवातीला अवघ्या तीन उत्पादनांपासून सुरुवात केलेल्या मअथर्व कॉस्मेटिक्समध्ये आज 70 हून अधिक दर्जेदार सौंदर्यप्रसाधने व इतर उत्पादने सुरू आहेत. यंदा शंभर उत्पादनांपर्यंत मजल मारण्याचा त्यांचा मानस आहे. उत्तमोत्तम उत्पादन तयार करून ते सर्वांच्या खिशाला परवडेल, असे उत्पादन आपण निर्माण करीत असल्याचे त्या आवर्जून सांगतात.

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत मआत्मज्योती संस्थेची निर्मिती त्यांनी केली आहे. या संस्थेमार्फत विविध सामाजिक कार्यांत पुढाकार घेऊन त्या समाजसेवादेखील करतात. राजश्री यांना अध्यात्मातसुद्धा रस आहे त्यांनी मस्पिरिच्युअल सायन्सफमध्ये 45 विविध कोर्सेस देखील केले आहेत.

आपल्या बुद्धीचा, क्षमतेचा, कौशल्याचा, व वेळेचा योग्य उपयोग करून घेणे, आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे, नवनवीन आव्हाने स्वीकारणे, समाजात स्वतंत्र स्थान निर्माण करणे व आपल्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत सुधारणा करणे या विचारांनी प्रेरित होऊन राजश्री यांची आज यशस्वी वाटचाल सुरू आहे. कुटुंबातील सर्वजण उच्चशिक्षित आहेत. मात्र कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना आज अथर्व कॉस्मेटिक्स प्रायव्हेट लिमिटेडचा भव्य डोलारा त्यांनी उभा केला आहे. त्यांचे हे कर्तृत्व वाखाणण्याजोगे आहे.