बिझनेस बँकेची आज निवडणूक

बिझनेस बँकेची आज निवडणूक

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

येथील बिझनेस बँकेची पंचवार्षिक निवडणूक (Business Bank election today) आज (दि.30) होत असून या निवडणुकीत 14 जागांसाठी 15 उमेदवार रिंगणात आहेत.नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेनंतर सहकार क्षेत्रात दुसरी महत्त्वाची बँक म्हणून बिझनेस बँक ओळखली जाते.

या बँकेची निवडणूक गेल्यावर्षी होणार होती. परंतु करोनामुळे ती होऊ शकली नाही. त्यानंतर या निवडणुकीचा जून महिन्यात कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. सदरची निवडणूक जुलै महिन्यात होणार होती; परंतु राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने निवडणूक स्थगित करण्यात आली होती. सदरची निवडणूक पुन्हा घोषित करण्यात आली व निवडणुकीची जुलै महिन्यात जी प्रक्रिया सुरू होती त्यानंतर तीच प्रक्रिया कायम ठेवण्यात आली.

या निवडणुकीत एकूण 19 संचालक निवडून येणार असून त्यापैकी पाच जागा या अगोदरच बिनविरोध झाल्या आहेत. आता 14 जागांसाठी सर्वसाधारण गटातून विद्यमान सहकार पॅनलचे 14 व जीवन घिया हे स्वतंत्र असे मिळून एकूण 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज (दि. 30) सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत जेलरोड येथील कोठारी कन्या शाळेत मतदान होणार असून उद्या (दि. 31) कुलथे मंगल कार्यालयात सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. साधारणत: 11 वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com