उद्यापासून लालपरी सुसाट, नाशिकहून पुणे, मुंबईला धावणार
नाशिक

उद्यापासून लालपरी सुसाट, नाशिकहून पुणे, मुंबईला धावणार

असे आहे वेळापत्रक

Bharat Pagare

नाशिक | Nashik

गेल्या पाच महिन्यांपासून आगारात विसावलेली लालपरी आजपासून (दि. २०) आंतरजिल्हा प्रवासास सुरूवात करणार अाहे.

शहरातील सी. बी. एस व महामार्ग बसस्थानकावरुन पुणे, मुंबई, बोरीवली, औरंगाबाद, धुळे, कसारा या मार्गांवर शिवशाही, निमआराम व साध्या राज्य परीवहन बसेस चालविल्या जाणार आहेत, अशी माहिती नाशिक विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी दिली.

कराेना संकटाचा सामना करतानाच मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक आस्थापना सुरू करण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून लालपरीची सेवा सुरू करावी अशी मागणी केली जात हाेती. त्यानुसार आंतरजिल्हा बस वाहतुक सुरु करण्यास परिवहन महामंडळाने विभाग नियंत्रकांना परवानगी दिली आहे.

या बससेवेत प्रति बस ५० टक्के आसन [प्रत्येक बसमध्ये फक्त २२ ]क्षमतेने प्रवाशांना प्रचलित दराने प्रवास करता येईल. तसेच प्रत्येक प्रवाशास मास्क घालणे बंधनकारक राहील. चालविण्यात येणा-या बसेस हया पूर्णतः निर्जतुकीकरण करुन चालविण्यात येणार असून तसेच प्रवाशांची गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार विविध मार्गांवर बस फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. प्रवाशांनी योग्य ती दक्षता घेणे आवश्यक राहील.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com