ST Bus
ST Bus|‘एसटी बस
नाशिक

'एसटी बस अनलाॅक’..या ठिकाणाहून झाली बसवाहतुक सुरू

नाशिकसाठी येवला, नांदगाव येथून वाहतूक सुरु

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | Nashik

मिशन बिगीन वन अगेनद्वारेे अनलाॅक प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामाध्यमातून राज्य मार्ग परिवहन महामंडळानेही बसगाड्यांतून प्रवासी वाहतूक सुरू करून अनलाॅकची प्रक्रिया सुरू केली आहे.

गुरुवार दि. ६ पासून येवला, नांदगाव,सटाणा येथून नाशिक येथे बससेवा सुरु करण्यात आली आहे. प्रवाशांच्या मिळणाऱ्या प्रतिसादानंतर टप्पाटप्याने बससंख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक नितीन मैद यांनी दिली.

कराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारे प्रवासी वाहतुकीस मनाई करण्यात अाली हाेती. यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी अहाेरात्र धावणाऱ्या लालपरीची चाके थांबली हाेती. मात्र मिशन बिगिन्स अंतर्गत राज्यशासनाच्या वतीने अंतर जिल्हा प्रवासी वाहतुकीस एसटी महामंडळाला परवानगी देण्यात आली हाेती.

मात्र काेराेनाच हाॅटस्पाट बनलेल्या नाशिक व मालेगावला यातून वगळण्यात हाेते. तसेच बसेसमधून मात्र प्रवासी वाहतूक करतांना ज्येष्ठ नागरिक व १२ वर्षाखालील मुलांना प्रवेश नसून मास्क व सॅनिटायझरचा वापर तसेच केवळ ५० टक्केच प्रवाशांना परवानगी बंधनकारक करण्यात आले हाेते.

दरम्यान अनलाॅकच्या पुढील टप्प्यात चार महिन्यानंतर सटाणा, नांदगाव, येवला येथून राेज दाेन बसेस तर सिन्नर, पिंपळगाव बसंवत येथून राेज चार बसेस नाशिकपर्यंत गुरुवार पासून सुरु करण्यात आल्या आहेे. मात्र ही बससेवा सकाळी ७ ते सांयकाळी ७ वाजेदरम्यानच असणार अाहे. या बससेवेेला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर टप्प्याने आणखी बसेस वाढविण्याचे नियाेजन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात अाले अाहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com