विठ्ठल मंदिर ते पंढरपूर बससेवा

विठ्ठल मंदिर ते पंढरपूर बससेवा

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

नगर परिषदेच्यावतीने (municipal council) उभारण्यात आलेल्या विठ्ठल मंदिरापासून (vitthal temple) दर एकादशीला (ekadashi) पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी बस घेून जाण्याचा संकल्प परिसरातील भाविकांनी केला असून या उपक्रमातील पहिल्या बसला माजी आमदार राजाभाऊ वाजे (former mla rajabhau vaje) व नगराध्यक्ष किरण डगळे यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

विठ्ठल मंदिराचे लोकार्पण (Dedication of Vitthal Temple) झाल्यापासून या मंदिरात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे (Religious events) आयोजन करण्यात येत आहे. या मंदिरापासून थेट पंढरपूरच्या (pandharpur) पांडूरंगाच्या भेटीसाठी दर महिण्याच्या एकादशीला बस (bus) सुरु करण्याची मागणी काही भाविकांनी केली होती. त्यावर राजाभाऊंनी सिन्नर (sinnar) आगाराचे व्यवस्थापक भूषण सुर्यवंशी यांची भेट घेऊन बस सोडण्याबाबत चर्चा केली होती.

बससाठी 40-42 प्रवासी भेटल्यास बसच्या भाड्यात मंदिरापासून स्वतंत्र बस सोडण्याची तयारी सुर्यवंशी यांनी दाखवली होती. थेट घरापासूनच बस मिळणार अशी माहिती मिळाल्यानंतर भाविकांची जमवा-जमव सुरु झाली. अवघ्या दोन दिवसात पंढरपूरला जाण्यासाठी 43 भाविक तयार झाले आणि त्यांनी परतीच्या प्रवासाचे 860 रुपये भरल्यानंतर पहिली बस पंढरपूरला जाण्यासाठी शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी विठ्ठल मंदिरात पोहचली.

तेथे राजाभाऊंच्या हस्ते श्रीफळ वाढवून, चालक-वाहकांचा सत्कार केल्यानंतर भाविकांना घेऊन बस पंढरपूरकडे रवाना झाली. ही बस शनिवारी (दि.16) सकाळी पंढरपूरात पोहचेल. एकादशीच्या मुहुर्ताला सर्व भाविक पांडूरंगाचे दर्शन घेतील व दूपारनंतर बस परतीच्या प्रवासाला लागेल. सायंकाळी उशिरा बस पुन्हा सिन्नरच्या विठ्ठलल मंदिरात पोहचेल.

यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र घोरपडे, एकनाथ हारक, दादा दिघे, दिगंबर पगर, संदिप जगताप यांच्यासह भाविक उपस्थित होते. दर महिण्याच्या एकादशीला विठ्ठल मंदिरापासून बस पंढरपूरला पाठवण्याचा विठ्ठल मंदिर सेवा समितीचा मानस असून पंढरपूरला पांडूरंगाच्या दर्शनासाठी जाऊ ईच्छिणार्‍या भाविकांनी समितीच्या पदाधिकार्‍यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com