सुकेणेसाठी आता पहाटेपासून बससेवा

सुकेणेसाठी आता पहाटेपासून बससेवा

कसबे सुकेणे । प्रतिनिधी Kasbe Sukene

नाशिक महानगर प्रदेश महामंडळाच्या (Nashik Metropolitan Region Corporation) सिटीलींक (Citylink) या शहर बस सेवेला (City bus service) प्रवाशांचा वाढता प्रतिसाद बघून दि.21 पासून पहाटे 5.45 वाजेपासून सीबीएस-नाशिक (cbs-nashik) साठी बस सेवा (bus servic) सुरू करण्यात आली असल्याची माहिती प्रवासी संघटनेने दिली आहे.

कसबे सुकेणे (kasbe sukene) ते सीबीएस नाशिक या मार्गावर सिटीलींक शहर बस सेवा सुरू झाल्यानंतर सुकेणे-ओझर या परिसरातून या बस सेवेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. कसबे सुकेणे येथून महाविद्यालयात (college) जाणार्‍या विद्यार्थ्यांसाठी व चाकरमान्यांसाठी सकाळी 5.45 वाजता शहर बस असावी अशी मागणी विद्यार्थी व नागरिकांनी सिटीलींक कंपनी व प्रवासी संघटनेकडे केली होती.

त्यानुसार सिटीलींक कंपनीने (Citylink Company) दखल घेत कसबे सुकेणे येथून सकाळी 5.45 वाजता पहिली बस सुरू करण्यात आली असल्याची माहिती सिटीलींक कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. सुकेणे ग्रामपालिकेने याकरिता सिटी लिंक च्या बसेस रात्री मुक्कामी राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली असून प्रवासी संघटनेने ग्रामपालिका सरपंच गीता गोतरणे, उपसरपंच धनंजय भंडारे, ग्रा.पं. सदस्य, ग्रामविकास अधिकारी रवी अहिरे व सिटीलींक कंपनीचे आभार मानले आहे.

सकाळी 5.45 वाजेपासून सीबीएस कडे शहर बस दर अर्ध्या तासाने सोडण्यात येणार असून कसबे सुकेणेसाठी सकाळी 5.30 वाजेपासून दर अर्ध्या तासाने एक शहर बस सुकेणेकडे सुरु झाल्याने प्रवासी, विद्यार्थी व चाकरमाने यांचेसह सिटीलींक कंपनीच्या अधिकार्‍यांचे तसेच प्रवासी संघटनेचे अध्यक्ष योगेश सगर, उपाध्यक्ष लक्ष्मण पडोळ यांनी आभार मानले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com