Video : ... अखेर सप्तशृंगी घाटात कोसळलेली बस काढली बाहेर
सप्तशृंगी गड | इम्रान शाह | Saptshringi Gadh
मागील आठवड्यात (दि.१२) जुलै रोजी सप्तशृंगी घाटात (Saptashrungi Ghat) गणपती टप्प्याजवळ खामगाव आगाराची बस (Khamgaon Aagar Bus) (एम.एच ४० एक्यु ६२५९) ही खोल दरीत कोसळल्याची घटना घडली होती. त्यावेळी या अपघातात (Accident) बसमधील एका प्रवाशी महिलेचा मृत्यू (Death) झाला होता. तर चालक आणि वाहक यांच्यासह २२ जण जखमी झाले होते...
त्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या (State Transport Corporation) कळवण आगार व्यवस्थापनाने अपघातग्रस्त बस दरीतून बाहेर काढण्यासाठी परवानगी मागितली होती. यानंतर आज आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ३४ नुसार नांदुरी ते सप्तशृंगीगड रस्ता (Nanduri to Saptshringi Gad Road) काही तासांसाठी बंद करत ४०० फूट खोल दरीत कोसळलेली बस मशनरीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली. आता हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
दरम्यान, यावेळी सप्तशृंगी गडाच्या चालता बोलता मदत केंद्राचे संस्थापक अध्यक्ष संदीप बेनके, रेशन दुकानाचे सप्तशृंगीगड अध्यक्ष अभिषेक दुबे, नांदुरी ग्रामपंचायत सरपंच सुभाष राऊत, सदस्य किरण आहिरे, समाजसेवक भालचंद्र कानडे, यांच्यासह नांदुरी आणि सप्तशृंगी गड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.