रेल्वे-बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दीच गर्दी

रेल्वे-बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दीच गर्दी

नांदगाव | प्रतिनिधी | Nandgaon

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दिवाळी पाडवा (Diwali Padwa) तसेच भाऊबीज (Bhaubeej) सणाच्या पार्श्वभूमीवर घरातील लक्ष्मीपूजन (Laxmipujan) आटोपल्यानंतर महिला आपल्या माहेरी जाण्यासाठी मार्गस्थ होत आहे.

यामुळे येथील रेल्वे स्टेशनसह (Railway station) बसस्थानक (bus station) आवार गर्दीने अक्षरश: फुलले आहे. एस.टी. (ST Bus) कमी व प्रवाशी जास्त यामुळे बसमध्ये जागा प्राप्तीसाठी अक्षरश: झुंबड उडत आहे.

भाऊबीजेसाठी सुवासिनी व आपल्या गावासाठी मार्गस्थ होत असल्याने रेल्वे स्टेशन (Railway station) आणि बस स्थानकात आज मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याचे चित्र दिसून आले. रेल्वे स्टेशनवर देखील असेच चित्र दिसून आले. गर्दीमुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत होता.

अनेक महत्त्वपूर्ण प्रवासी रेल्वे गाड्यांचे आरक्षण (Reservation of Trains) यापूर्वीच फुल झाले आहे. तसेच रेल्वेच्या वेटिंगवर सुद्धा मोठे नंबर लागलेले या आठवड्यात दिवाळी सणाची सुट्टी (Diwali holiday) सुरू झाली. तसेच दिवाळीची सुट्टी सुरू झाल्याने शाळा-महाविद्यालय (school-College) बंद झाले आहेत. त्यामुळे बसस्थानक व रेल्वेस्थानकावर गर्दीत वाढ झाली आहे.

नांदगाव (nandgaon) आगारातर्फे प्रवाशांची वाढती गर्दी (rush of passengers) लक्षात घेऊन बस स्थानकातून विविध ठिकाणी आणि गर्दीच्या मार्गावर जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. गेली दोन वर्ष करोनामुळे नागरिकांना घरीच दिवाळी (diwali) साजरी करावी लागली होती. करोना निर्बंधामुळे नागरिकांनी हे प्रवास टाळला माहेरवाशींनीना देखील दिवाळीसाठी माहेरी जाता आले नव्हते.

परंतू यंदा निर्बंध मुक्त वातावरण असल्यामुळे सर्व जण प्रवासाचे बेत आखत असल्याने रेल्वे आणि बसस्थानक गर्दीने फुलून गेले आहेत. रेल्वे व बस उपलब्ध होत नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून अनेकांनी खाजगी वाहतुकीचा आधार घेतल्याने या वाहन चालकांची दिवाळी यंदा जोरात राहणार असल्याचे चित्र दिसून आले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com