बस व दुचाकीचा अपघात; तरुणाचा मृत्यू

बस व दुचाकीचा अपघात; तरुणाचा मृत्यू

दहिवड | मनोज वैद्य Dahivad

देवळा-मालेगाव रस्त्यावर (Deola Malegaon Road) देवळा शहरातील सब स्टेशन जवळ बस व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दहिवड येथील ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून तरुणाच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

आज दि ३१ मार्च रोजी दुपारच्या सुमारास एसटी बस क्रमांक एमएच ४० वाय ५६६० ही देवळ्याहून मालेगावकडे जात असतांना त्याच वेळी याच रस्त्याला देवळा शहराकडून आडव्या रस्त्यावरुन एक ऍक्टिवा दुचाकी बस समोर आली. या दुचाकीला वाचविण्याच्या नादात एसटी बसने दहिवडहून देवळ्याकडे जाणाऱ्या पल्सर दुचाकी क्रमांक एमएच ४१ बीसी १४२७ ला जोरदार धडक दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

यावेळी रस्त्यावर स्वतःच्या बाजुने जात असलेल्या पल्सर दुचाकी बसच्या पुढच्या चाकात घुसल्याने दुचाकीस्वार नितीन शांताराम देवरे (वय २९, रा. दहिवड) हा गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ मालेगाव येथील रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

नितीनच्या मृत्यूची बातमी कळताच आई-वडीलांनी हंबरडा फोडला. त्याच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगी, आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. अपघातातील मृत तरुणावर दहिवड येथे शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. या अपघाताप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु असल्याची माहिती देवळा पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com