कारमध्ये आढळला जळालेला मृतदेह

कारमध्ये आढळला जळालेला मृतदेह

इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri

मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) वाडीव-हे परिसरातील (Wadivahre Area) मिलेट्रीच्या हद्दीत काही महिन्यापूर्वी एका डॉक्टर महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याची घटना ताजी असतांनाच पुन्हा एकदा इगतपुरीतील आंबेवाडी (Ambewadi) येथे एका कारमध्ये जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, कारमध्ये (Car) जळालेल्या अवस्थेत आढळलेला मृतदेह स्त्रीचा आहे की पुरुषाचा यासंदर्भात अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही. या अज्ञात मृतदेहाचा (dead body) खुन (Murder) करून कारला आग (Fire) लावल्याने ही कार पुर्णपणे जळुन खाक झाली आहे. तसेच कारच्या दोन्ही बाजुकडील नंबर प्लेटाही जळुन गेल्या आहेत.

दरम्यान, घोटी पोलीस ठाण्याचे (Ghoti Police Station) सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर (API Dilip Khedkar) यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात (District Government Hospital) पाठवण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com