Video : मालेगावात संजय राऊतांच्या पुतळ्याचे दहन

Video : मालेगावात संजय राऊतांच्या पुतळ्याचे दहन

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गिरणा शुगर शेअर विक्री प्रकरणात राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse)यांच्यावर केलेल्या आरोपाचे पडसाद आज विधानसभेपाठोपाठ मालेगाव शहरात (Malegaon City) देखील उमटल्याचे पाहायला मिळाले...

Video : मालेगावात संजय राऊतांच्या पुतळ्याचे दहन
अजित पवार-दादा भुसेंमध्ये अधिवेशनात खडाजंगी; काय आहे प्रकरण?

मंत्री दादा भुसे यांनी आज विधानसभेत (Legislative Assembly) राऊतांच्या आरोपावर उत्तर देताना म्हटले की, याप्रकरणी कोणत्याही एजन्सी मार्फत चौकशी करावी. काही सिद्ध झाल्यास आमदार आणि मंत्रीपदाचा राजीनामा (Resignation) देत राजकारणातून संन्यास घेईल. तसेच आमच्या मतांवर निवडून आलेल्या महागद्दार राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा असे खुले आव्हानही दिले होते. याशिवाय राऊत यांनी माफी न मागितल्यास मालेगावचे शिवसैनिक त्यांना धडा शिकवतील असा इशारा देखील भुसेंनी दिला होता.

Video : मालेगावात संजय राऊतांच्या पुतळ्याचे दहन
अन् आदित्य ठाकरेंच्या लग्नावरून सभागृहात पिकला हशा; फडणवीस म्हणाले, आम्ही...

त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाचे संतप्त पडसाद आज मालेगाव शहरात उमटले असून शिवसेनेच्या (Shivsena) संतप्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोसम पुलावर (Mausam Bridge) राऊत यांचा निषेध केला. तसेच राऊतांच्या पुतळ्यास जोडे मारत त्याचे दहन केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com