
वावी | Vavi
सिन्नर-शिर्डी महामार्गावर (Sinnar Shirdi Highway) पांगरी (Pangri Village) येथे चालत्या गाडीने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण गाडी (Burning Car) जळून खाक झाली.
ही घटना आज सकाळी साडे सहाच्या दरम्यान घडली आहे. नाशिकरोड (Nashikroad) येथील प्रतीक पंढरीनाथ पवार व वैभव पंढरीनाथ पवार हे आपल्या कारसह ( एमएच ०१ एएक्स ६५०७) नाशिक रोड येथून साईबाबांच्या दर्शनासाठी (Saibaba Temple) निघाले.
यावेळी महामार्गावरील मौजे पांगरी खुर्द येत हद्दीत अचानक गाडीने पेट घेतला. गाडीतून अचानक धूर येऊ लागल्याने पवार यांनी आपली कार महामार्गाच्या लगत लावत उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र बुलेट उघडताच कारण प्रचंड पेट घेतला. त्यामुळे संपूर्ण कार जळून खाक झाली.
यावेळी पांगरी खुर्द येथील पोलीस पाटील संदीप शिंदे (Police Patil Sandip Shinde) यांनी तात्काळ पोलीस स्टेशन (Police Station) ला याबाबत माहिती दिली. लागलीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.