मुंबई नाक्यावर कारने घेतला पेट; चार विद्यार्थिनी बालंबाल बचावल्या

मुंबई नाक्यावर कारने घेतला पेट; चार विद्यार्थिनी बालंबाल बचावल्या

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरातील वर्दळीच्या भागात असलेल्या मुंबई नाका सर्कलमध्ये (Mumbai naka circle) आज दुपारी एका कारने पेट घेतला. (Burning Car) या कारमधून चार विद्यार्थिनी प्रवास करत होत्या. अचानक कारमधून धूर बाहेर पडू लागल्यामुळे या विद्यार्थिनी बाहेर पडल्या. सुदैवाने या घटनेत अनर्थ टळला....

प्राप्त माहितीनुसार, या विद्यार्थिनी वास्तूविशारदचे शिक्षण घेत असल्याचे समजते. वाढलेल्या उष्णतेमुळे ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारमधून धूर बाहेर पडू लागल्यानंतर तात्काळ अग्निशमन विभागाला (Fire department) याबाबतची माहिती देण्यात आली. काही क्षणातच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

Related Stories

No stories found.