वेळुंजे । Velunje

त्र्यंबक तालुक्यातील गणेशगाव (वा), धुमोडी या परिसरातील डोंगरांना आग लागून हजारो झाङे जळून खाक झाली आहेत.

गणेशगाव(वा), धुमोडी या परिसरातील डोंगरांना दर दोन ते तीन महिन्यांनी वणवा लागण्याच्या घटना घडत असतात. ऐन बहरात आलेल्या झाडांना अचानक लागलेल्या आगीमुळे नुकसान झाले आहे. अनेक वर्षांपासून येथील डोंगरावर संयुक्त वनव्यवस्थापन समिती या झाडांचे संगोपन वनव्यवस्थापन, ग्रामस्थ करीत असतात.

परंतु अशा प्रकारच्या आगीमुळे झाडे, जंगली प्राणी नष्ट होताना दिसून येत आहे. यामुळे स्थानिक वनविभागाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच स्थानिक ग्रामस्थांना हाताशी घेऊन काही उपाययोजना आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र शासन व वनविभाग हे प्रत्येक वर्षी वृक्षारोपण यावर कोट्यवधी रुपये खर्च करीत असते. परंतु जे झाडे लावले जातात त्यांची संरक्षण करण्यासाठी फक्त एक वनपाल नियुक्त केलेला दिसून येतो. ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे काम बारगळले असून वनविभागाने याकडे लक्ष दिले पाहिजे.

- नामदेव महाले.(ग्रामस्थ)गणेशगाव वा.