
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
म्हसरूळ (Mhasrul) पोलीस ठाणे अंतर्गत वाढणे कॉलनी येथे घरफोडीचा प्रकार समोर आला आहे. या घरफोडीत (burglary) सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला.
याबाबत वैशाली यशवंत भोये (Vaishali Yashwant Bhoye) (वय 32 रा. वाढणे कॉलनी म्हसरूळ) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 13 मार्च रोजी चोरट्याने त्यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून एकूण एक लाख 42 हजार 500 रुपये किमतीचा माल चोरून नेला.
यामध्ये साठ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या (gold) तीन चैन, तीस हजार रुपये किमतीचे वेढणे चार नग, पंधरा हजार रुपये किमतीचे वेढे दोन नग, तीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या तसेच साडेसात हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अडीच ग्रॅम वजनाचे कानातील टॉप असा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे.
दरम्यान, यासंदर्भात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात चोरट्याचा तपास करत आहेत.