वडाळा शिवारात घरफोडी

वडाळा शिवारात घरफोडी

नाशिक । Nashik

वडाळा शिवारातील (Wadala Shiwar) खोडे नगर परिसरात चोरट्याने घरफोडी (Burglary) करून ९५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

याप्रकरणी अशोक बाळासाहेब पवार (४०, रा. खोडे नगर) यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्यात (Mumbai naka Police Station) घरफोडीची फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी २ ते ३ ऑगस्ट दरम्यान पवार यांच्या घरात घरफोडी करून घरातील २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व ७० हजार रुपयांची रोकड लंपास केली. मुंबईनाका पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com