नाशकात घरफोडी; पावणे पाच लाखांचा ऐवज लंपास

नाशकात घरफोडी; पावणे पाच लाखांचा ऐवज लंपास

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

बंद घराच्या दरवाज्याची कडी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे चार लाख 79 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात (Upnagar police station) गुन्हा दाखल करण्यात आला....

नाशकात घरफोडी; पावणे पाच लाखांचा ऐवज लंपास
वादग्रस्त लाचखोर शिक्षणाधिकारी झनकर यांची संपत्ती लाखोंच्या घरात

यासंदर्भात शैलजा विश्वजीत भोईर (Shailja Bhoir) (रा. प्लॉट नं. ७-N-4 स्प्रिंग वेली, शिवसृष्टी बोधलेनगरच्या पाठीमागे तपोवन रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. भोईर यांच्या बंद घराचे दरवाजाचे कडी कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने हात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाचे लोकर तोडून कपाटातील सुमारे चार लाख 79 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.

त्यात दोन लाख तीस हजार रुपये किमतीच्या पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, 50 हजार रुपये किमतीचे तीन तोळे वजनाची सोन्याची पोत, चाळीस हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, चाळीस हजार रुपये किमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस, तीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन डायमंड अंगठी, पंचवीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट, पंधरा हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण, पंधरा हजार रुपये किमतीचे चांदीचे तीन कॉइन, सहा हजार रुपये किमतीचे सोन्याच्या रिंगा, वीस हजार रुपये किमतीचा सोन्याचा वेढा असा ऐवज चोरून नेला.

दरम्यान भोईर कुटुंबीय घरी आले असता त्यांना आपल्या घरी चोरी झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी तातडीने उपनगर पोलीस स्टेशन गाठले व याबाबतची तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे (Anil Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिंदे करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com