नाशकात घरफोडी; साडेचार लाखांचा ऐवज लंपास

नाशकात घरफोडी; साडेचार लाखांचा ऐवज लंपास

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

बंद दरवाज्याची कडी कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकर मध्ये असलेले सोन्याचे दागिने व रोख रकमेसह सुमारे चार लाख वीस हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashikroad Police Station) अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

उत्तम धोंडू सारूक्‍ते (रा. मराठा कॉलनी, चेहेडी पंपिंग स्टेशन) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हंटले आहे कि, सारुक्ते हे काही कामानिमित्त बाहेर गेलो होते. या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने बंद दरवाज्याची कडी तोडून घरात प्रवेश केला.

लोखंडी कपाटातील एक लाख 62 हजार रुपये किमतीचे 65 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 50 हजार रुपये किमतीचे 20 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, पंचवीस हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाची सोन्याची चेन,

पंचवीस हजार रुपये किमतीचे सोन्याची बोरमाळ, 62 हजर 500 रुपये किमतीचे सोन्याचा नेकलेस, दहा हजार रुपये किमतीची सोन्याची नथ, पाच हजार रुपये किमतीची सोन्याची नथ, पंचवीस हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या,

पाच हजार रुपये किमतीचा सोन्याचा वेल व 50 हजार रुपये रोख असा सुमारे 4 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com