नांदूरशिंगोटे येथे भरदिवसा घरफोडी

नांदूरशिंगोटे येथे भरदिवसा घरफोडी

नांदूरशिंगोटे । वार्ताहर Nandurshingote

घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना ( burglary by unknown thieves )मंगळवारी सकाळी दहा वाजता घडली. चोरट्यांनी कपाट तोडून पाच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह दहा हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या श्वानपथकानेही माग काढण्याचा प्रयत्न केला.

निमोण मार्गावरील ( Nimon Road ) घुले वस्तीवर ही घटना घडली. शरदचंंद्र नानासाहेब घुले यांचे मुख्य रस्त्यालगत घर आहे. आजूबाजूलाही वस्तीवर दाट लोकवस्ती असली तरी चोरट्यांनी दोन्ही बाजूच्या घरांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

घुले हे अकरा वाजता घराकडे आले तेव्हा चोरीचा संशय आला. हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची माळ, हजार रुपये किमतीची पोत व मंगळसूत्र, हजार रुपयांची सोन्याची अंगठी व हजार रुपये रोख असा एकूण एक लाख हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

पोलीस उपअधीक्षक डॉ. अर्जुन भोसले, सहायक पोलीस निरीक्षक सागर कोते, सहायक पोलीस उपनिरीक्षक व्ही. के. सोनवणे, पोलीस हवालदार प्रवीण अंढागळे, प्रकाश चव्हाणके, प्रकाश उंबरकर आदींसह पोलीस सेवक घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात चोरट्याविरोधात पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com