शेती मशागतीसाठी आता बैलजोडीला पसंती

डिझेलच्या वाढत्या दराने यांत्रिक शेती महागली
शेती मशागतीसाठी आता बैलजोडीला पसंती

निफाड । आनंद जाधव Niphad

दिवसागणिक पेट्रोल (petrol), डिझेलचे (Diesel) वाढते भाव (Rising prices) आणि शेतमाल बाजार भावातील चढ-उतार, नैसर्गिक आपत्ती (Natural disasters), मशिनरी दुरुस्तीवर (Machinery repair) होणारा वाढता खर्च विचारात घेता शेतकरी (farmer) आता शेतीमशागतीसाठी पुन्हा बैलजोडीला (Bull) पसंती देत असून कांदा (onion) लागवडीसाठी सरी पाडणे, वाफे बांधणी आदी कामांसाठी आता बैलजोडीचा वापर होत असल्याने बैलजोडीला पुन्हा ‘अच्छे दिन’ येवू लागले आहेत.

पुर्वीच्या काळी सधन शेतकर्‍यांकडे चार ते सहा बैलजोड्या असत तर सर्वसामान्य शेतकर्‍याच्या दारात देखील एक बैलजोडी, दुधासाठी एखादी गाय हमखास बांधलेली दिसे. घरची लक्ष्मी म्हणून शेतकरी व घरातली माणसे या जनावरांची विशेष काळजी घेत. जनावरांची पडणारी विष्ठा शेणखत म्हणून शेतात टाकले जात असे. परिणामी सेंद्रीय खत (Organic manure) म्हणून पीक देखील जोमदार येत असे.

परंतु काळानुरुप शेतीत बदल होत गेले. बाराबलुतेदारी पद्धत केव्हाच काळाच्या पडद्याआड गेली. ट्रॅक्टर (Tractor) द्वारे झटपट शेती मशागत होऊ लागली. साहजिक शेतकरी यांत्रिक शेतीकडे वळल्याने बैलाने शेती करण्याची पद्धत केव्हाच मागे पडली. परिणामी शेतकर्‍यांना देखील बैलजोडी सांभाळणे परवडेनासे झाले. पूर्वी ज्या शेतकर्‍यांकडे दोन बैलजोड्या दिसायच्या तिथे आता मोठा व छोटा ट्रॅक्टर दिसू लागला.

तर गरीब शेतकरी देखील भाडेपट्टा देवून ट्रॅक्टरने शेतीची मशागत करू लागला. परिणामी शेतकर्‍यांकडे बैलाची संख्या घटली. परंतु जशी मशिनरी वाढली तसेच (petrol), डिझेलचे (Diesel) दर देखील वाढत गेले. आजच्या परिस्थितीत पेट्रोल, डिझेलने शंभरी पार केल्याने ते आता परवडेनासे झाले. त्यातच शेतमाल बाजारभावातील चढ-उतार, उत्पादन खर्चात होणारी वाढ या सार्‍या गोष्टींचा विचार करीत शेतकरी आता पुन्हा बैलजोडीने शेतीमशागत करण्याला प्राधान्य देवू लागला आहे.

बैलजोडीमुळे नांगरणी, वखरणी, फळी देणे, सारे पाडणे, फणनी आदी कामांबरोबरच शेतमाल वाहतूकीसाठी देखील मदत होते. तर बैलांना खाद्य म्हणून शेतात पिकणारा चारा, घास व भुस गवत याचीच गरज भासते. त्यासाठी वेगळा खर्च करण्याची गरज भासत नाही. तसेच शेतात ये-जा करण्यासाठी देखील बैलजोडीचा वापर होत असल्याने इंधनाच्या खर्चात बचत होते.

त्यामुळे आता शेतकरी पुन्हा बैलशेतीकडे वळू लागल्याचे चित्र ग्रामिण भागात दिसू लागल्याने कित्येक दशकानंतर आता बैलजोडी, बैलगाडीला ‘अच्छे दिन’ येवू लागले आहे. कारण आता पेट्रोल, डिझेलचे वाढलेले दर कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे यांत्रिक शेती करणे परवडणारे नसल्याने शेतीसाठी बैलजोडी हाच उत्तम पर्याय शेतकर्‍यांना दिसू लागला आहे. त्यामुळे आता पुन्हा शेतकरी शेतीमशागतीसाठी बैलजोडीला पसंती देवू लागले आहे.

इंधन दरवाढीला आळा घालणे गरजेचे सध्या पेट्रोल 110 रुपये लिटर तर डिझेल 92.66 रुपये लिटर प्रमाणे विक्री होत आहे. त्यामुळे शेत नांगरणी करावयाची झाल्यास हजारो रुपये डिझेल साठी मोजावे लागतात. त्यात कधी मशिनरीची दुरुस्ती तर कधी अवजारांवर खर्च होतो. पूर्वी पेट्रोल 60 रुपये तर डिझेल 40 रुपये लिटरने मिळत होते. तर चाळीस वर्षांपूर्वी डिझेल 7 ते 8 रुपये लिटरने मिळत होते. मात्र आताच्या इंधन भावाने शेतीची मशागत परवडत नाही. शासनाला इंधनातून मोठा महसूल मिळत असल्याने इंधन कंपन्या देखील मोठी भाववाढ करीत आहे. शासनाचे इंधन दरवाढीवर नियंत्रण नाही. त्यामुळे त्याचा फटका शेतीला बसत आहे.

पुंडलिक कुंदे, शेतकरी (रसलपूर)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com