इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडी मोर्चा

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडी मोर्चा

मालेगाव । प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या धोरणामुळे पेट्रोल-डिझेल, गॅस, इंधनाची दरवाढ झाल्याने महागाईचा भडका उडून सर्वसामान्य जनता अक्षरश: होरपळून निघत आहे. मात्र मोदी सरकारला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी कुठलेही सोयरसुतक नसल्याने इंधन दरवाढीच्या विरोधात संपूर्ण देशातून व्यक्त होत असलेल्या आक्रोशाकडे दुर्लक्ष केले जात आहे. संत्रस्त करून सोडणार्‍या या महागाईस भाजप सरकारच जबाबदार असल्याने या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडी मोर्चा काढण्यात आला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी येथे बोलतांना केले.

तालुका-शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ आज राष्ट्रीय एकात्मता चौकातून अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. एकही भूल कमल का फूल, इंधन दरवाढ कमी करा आदी घोषणा देत मोर्चेकर्‍यांनी कॅम्परोड परिसर दणाणून सोडला होता. या मोर्चात महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश लक्ष वेधून घेणारा होता. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा येताच त्याचे रूपांतर सभेत झाले.

यावेळी केंद्रातील मोदी सरकारमुळेच पेट्रोलने प्रती लिटरला किंमतीचे शतक पार केले असून डिझेलदेखील शतकाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात इंधनाचे दर थोडेफार वाढले की, बहुत हुई महंगाई कि मार अशी घोषणा देणारे नेते आता पेट्रोलचे भाव 104 रुपये तर डिझेलचे भाव 96 रुपये प्रति लिटर झाले तरी शांत का असा सवाल अ‍ॅड. पगार यांनी यावेळी बोलतांना केला.

इंधन दरवाढीमुळे महागाईचा अक्षरश: भडका उडाला असून जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे मोदी सरकारने जनतेचा अंत न पाहता इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी यासाठी राष्ट्रवादीतर्फे जिल्ह्यात आंदोलन हाती घेण्यात आले आहे. इंधन दरवाढ कमी न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल, असा इशारा अ‍ॅड. पगार यांनी शेवटी बोलतांना दिला. यावेळी तालुकाध्यक्ष संदीप पवार, पुरुषोत्तम कडलग, प्रेरणा बलकवडे, डॉ. जयंत पवार, राजेंद्र भोसले, अरुण देवरे, राजेंद्र जाधव, यशवंत शिरसाट आदींची भाषणे झाली.

बैलगाडी मोर्चामध्ये विजय पवार, राजेंद्र भोसले, डॉ. जयंत पवार, अरुण देवरे, ग्रंथालय सेलचे अध्यक्ष विजय पवार, दिनेश ठाकरे, किशोर इंगळे, प्रशांत पवार, बाळासाहेब वाणी, राजेंद्र जाधव, विनोद शेलार, गुलाबराव चव्हाण, प्रकाश वाघ, अशोक पवार, बागलाण तालुकाध्यक्ष शैलेश सुर्यवंशी, सटाणा शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, हेमलता मानकर, सायरा शेख, पुष्पलता उदावंत, वर्षा लिंगायत, निलिमा काळे, वैशाली मोरे, आशा काकळीज, ज्योती नंदन, अरुणा नंदन, दिपाबाई चौधरी, मंगलबाई मानकर, प्रतिभा घरटे, विमल नंदन आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com