Video : बिनव्याजी कर्ज मिळाले पाहिजे, जमिनींचे लिलाव थांबले पाहिजे..!

भाजप किसान मोर्चातर्फे बैलगाडी आंदोलन
Video : बिनव्याजी कर्ज मिळाले पाहिजे, जमिनींचे लिलाव थांबले पाहिजे..!

नाशिक । Nashik

बँकांना ज्या पद्धतीने पीक कर्ज (Crop Loan) वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे ते पूर्ण करावे, जिल्हा बँकेवर प्रशासक (Bank Administrator) असून ते मनमानी कारभार करीत आहेत, हे शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हि शासन याकडं डोळेझाक करीत आहे, म्हणून आज शेतकऱ्याला पीककर्ज वाटप झालं पाहिजे, तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळाले पाहिजे, त्यांच्या जमिनींचे लिलाव (Land auctions) थांबले पाहिजे, असे मत माजी मंत्री सदाभाऊ खोत(Ex Minister Sadabhau Khot) यांनी यावेळी व्यक्त केले.

दरम्यान भाजप किसान मोर्चातर्फे(BJP Kisan Morcha) नाशिक जिल्हा बँकेसमोर (NDCC Bank) बैलगाडी आंदोलन(Bullock Cart Agitation) करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या आंदोलनावेळी खा. भारती पवार, (MP Bharati Pawar) किसान मोर्चाचे नेते वासुदेव काळे, रयत क्रांंतीचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, आमदार राहुल आहेर, दिलीप बोरसे, देवयानी फरांदे, सीमा हिरे, दीपक पवार, ज्योती निरगुडे, वशाल पवार, सचीन दराडे, आत्माराम कुंंभाडेर्र्, बंंडु भाबड, संजय वाबळे, आदींंसह शेतकरी उपस्थित होते.

यावेळी खा. भारती पवार म्हणाल्या कि, नाशिक जिल्हा मध्यवर्ती जिल्हा बँकेने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना लिलावाच्या नोटिसा पाठवल्या आहेत, त्याला विरोध म्हणून हे आंदोलन आहे. सातबारा कोरा करणार असे आश्वासन दिले होते, ते कुठे गेले, पीक कर्ज वाटपाचा काय झालं झालं, शेतकऱ्यांना नोटिसा पाठवूं धमकावले या प्रकाराचा आम्ही निषेध करतो, अशा शब्दांत त्यांनी महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi ) सरकारवर ताशेरे ओढले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com