इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा बैलगाडी मोर्चा

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा बैलगाडी मोर्चा

सटाणा/नाशिक | Satana/ Nashik

मोदी सरकारने घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढवले असून प्रचंड महागाई वाढली आहे. (Fuel Price hike) त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आता जगायचे कसे ? असा प्रश्न पडला आहे. केंद्रातील भाजप सरकारने तातडीने इंधनाचे भाव कमी करावेत व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी केली आहे.... (NCP District president adv Ravindra Pagar)

घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सटाणा येथे बस स्थानकापासून तहसीलदार कार्यालयावर जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांच्या नेतृत्वाने बैलगाडी मोर्चा (Bullock cart agitation ) काढण्यात आला.

त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, माजी आमदार दीपिका चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश सुर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, सामजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष यशवंत शिरसाठ,

ओबीसी सेलेचे जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, डॅाक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॅा.योगेश गोसावी, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, संदिप आहिरे, सम्राट काकडे, सुमित वाघ, सुरेखा बच्छाव, सुयोग आहिरे, सागर वाघ आदींची भाषणे झाली.

अच्छे दिनच्या घोषणेला भुलून निवडून दिलेल्या केंद्रातील भाजप (BJP) सरकारला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी कुठलेही देणेघेणे नसल्याचा आरोप माजी आमदार संजय चव्हाण यांनी यावेळी बोलतांना केला.

बैलगाडी मोर्चा (Bullock cart agitation) तहसीलदार कार्यालयावर पोहचल्यानंतर वरील मागणीचे निवेदन तहसीलदार जितेंद्र इंगळे यांना देण्यात आले.

घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आलेल्या बैलगाडी मोर्चा प्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पगार, माजी आमदार संजय चव्हाण, माजी आमदार दीपिका चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश सुर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, सामजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष यशवंत शिरसाठ, ओबीसी सेलेचे जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, डॅाक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॅा.योगेश गोसावी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com