भाजपा शहराध्यक्षपदासाठी मोर्चे बांधणी गतिमान

भाजपा शहराध्यक्षपदासाठी मोर्चे बांधणी गतिमान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भाजपच्या शहराध्यक्ष (City president of BJP) बदलाच्या प्रश्नावर पक्षांतर्गत फुसफुस उफाळून येऊ लागली आहे अनेक इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सूरूवात केल्याचे चित्र आहे.

संघटना पातळीवर परस्परांमध्ये समन्वय नसल्याने वातावरण दिसून येत आहे सद्यस्थितीत माजी सभागृहनेते दिनकर पाटील (Dinkar Patil) स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते (Former Speaker Ganesh Gite) नामकोचे माजी चेअरमन हेमंत धात्रक, हिमगौरी अडके, प्रशांत जाधव, उत्तमराव उगले यांच्या नावाची विशेष चर्चा रंगू लागलेली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या (election) पार्श्वभूमीवर भाजपाला शहर पातळीवर नवीन नेतृत्वाचा शोध घेणे गरजेचे असल्याची कुजबुज गतिमान झाली आहे.

राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलल्या नंतर जिल्हा शहर पातळीवर सर्वच फळ्यांमध्ये बदल केला जात असतो. परंतु प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (State President Chandrasekhar Bawankule) यांनी बदलायला सुरुवात केली नसल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. दोन वर्षांपूर्वी आमदार राहुल ढिकले (MLA Rahul Dhikle) यांचे नाव शहराध्यक्ष पदासाठी निश्चित झाल्याचे बोलले जात होते. मात्र संघटना स्थरावर आमदार व खासदारांना संघटनेची पदे न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्यांचे नाव मागे पडले.

ढिकले यांच्या नंतर पक्षात मराठा व इतर मागासवर्गीय नेतृत्वाचा शोध घेतला जात आहे, त्यात माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे स्थायी समिती माजी सभापती गणेश गीते व नामको माजी चेअरमन हेमंत धात्रक याच्यादेखील नावाची चर्चा होत आहे.संघटनेत पदांवर असलेल्या काही पदाधिकार्‍यांच्या नावाची देखिल चर्चा होत असल्याने

गिरीष पालवे यांची बढती होणार की त्यांच्यावरच जबाबदारी दिली जाणार याबद्ल तर्क वितर्क वर्तवले जात आहेत. येणार्‍या निवडणुकीत शहरातील पदाधिकार्‍यांवर व राजकारणात प्रभाव टाकणारे व्यक्तिमत्त्वाचा विचार शहराध्यक्ष पदासाठी केला जाईल असा सूर जाणकार भाजपा पदाधिकार्‍यांमधून उमटताना दिसून येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com