औद्योगिक वसाहतीत 'एमआयडीसी पोलीस ठाणे निर्माण करा: भुजबळ
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक शहराची (nashik city) पौराणिक शहर म्हणून असलेली ओळख वाढत्या गुन्हेगारीमुळे (criminality) बदलत चालली असून नाशिक आता क्राईम कॅपिटल (Crime Capital) होतेय.
त्यामुळे नाशिकच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी करत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Former Deputy Chief Minister Chhagan Bhujbal) यांनी अर्थसंकल्पावरील मागण्यांवर चर्चा करतांना नाशिकच्या गृह, उद्योग, ऊर्जा, जलसंपदासह विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले.
यावेळी भुजबळ म्हणाले कि, वाढत्या गुन्हेगारीमुळे नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्याचे (Ambad Police Station) विभाजन करून नवीन 'एमआयडीसी पोलीस ठाणे' (MIDC Police Station) निर्माण करण्याची शासनाकडे आम्ही मागणी केलेली आहे.
गृह विभागाने (Department of Home Affairs) या प्रस्तावाला ताबडतोब मान्यता देऊन, नाशिक शहरावरील ताण पाहता नविन पोलीस स्टेशनला (Police Station) मंजुरी दिली गेली पाहिजे. पोलीस आयुक्तालयाची (Police Commissionerate) हद्दवाढ आणि पोलीस ठाण्यांच्या विभाजनाला लवकरात लवकर शासनाने मंजुरी दिली पाहीजे तसेच पोलीसांचे मनुष्य बळ वाढविण्यात यावे अशी मागणी करत पोलीसांकडे असलेल्या गाड्यांची अवस्था अतिशय वाईट झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
येवला शहर आणि ग्रामीण पोलीस स्टेशनला (Rural Police Station) चांगली वाहने नाही याकडे लक्ष वेधत जर पोलिसांना योग्य सुविधा दिल्या नाही तर ते काम कसे करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उद्योगांच्या प्रश्नावर ते म्हणाले की, मुंबई पुण्यानंतर नाशिक हे उद्योगांचे डेस्टिनेशन म्हटले जाते. मात्र नाशिकचे उद्योग इतरत्र पळविले जात आहे. नाशिकच्या उद्योगांबाबत अनेक घोषणा करण्यात आल्या आहे. मात्र अद्याप हे उद्योग सुरु होऊ शकले नाही.
अंबड औद्योगिक वसाहतीमधील (Ambad Industrial Estate) उद्योजकांना अधिक सेस भार लावण्यात येत असल्याने उद्योजकही त्रस्त आहे. त्यामुळे नाशिकच्या उद्योगांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येऊन उद्योग वाढी प्रयत्न करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
अर्थसंकल्पावरील मागण्या मांडत असतांना गृह विभागाच्या प्रश्नांवर छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक शहर धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक, महापुरुषांचे शहर म्हणून ओळखले जाते, मात्र अलिकडच्या वर्षांतील गुन्हेगारीची आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल कि, नाशिक शहर क्राईम कॅपिटल अशी नवी ओळख निर्माण होऊ पाहत आहे. दर दिवसाआड एक खुनाची घटना समोर येत आहे. नाशिक शहरात वर्षभरात ४४५५ गुन्हे दाखल होवून गुन्ह्यांच्या चढत्या आलेखामुळे आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झालेली आहेत.