‘घर तिथे किल्ला’ स्पर्धा

‘घर तिथे किल्ला’ स्पर्धा

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

येथील शिवायुवा प्रतिष्ठान Shivayuva Pratishthan या सामाजिक संस्थेच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त Shri Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti शालेय विद्यार्थ्यांसाठी 'घर तिथे किल्ला' या किल्ले बनवा स्पर्धेचे Build forts competition आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे तसेच शौर्य, राष्ट्रभक्ती अशा अशा अनेक सद्गुणांची प्रेरणा जागृत करणारे किल्ले म्हणजे महाराष्ट्राचे मानबिंदू आहेत. अनेक नागरिक सहकुटुंब सहपरिवार किल्ल्यांना भेट देण्यासाठी जातात.

विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमात देखील किल्ल्यांचा समावेश असतो. लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समजावा तसेच किल्लाप्रति प्रेम निर्माण व्हावे याच अनुषंगाने येथील शिवयुवा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने सदरची किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा 15 ते 18 फेब्रुवारी या दरम्यान आयोजित करण्यात आली असून शालेय विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेऊन आपल्याच घरी किल्ला तयार करून त्याचे पाच फोटो काढून आपले नाव, पत्ता व किल्ल्याचे नाव यासह आपला मोबाईल नंबर, प्रतिष्ठानच्या व्हॉट्सप नंबर अथवा ई-मेलवर पाठवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com