
सिन्नर । वार्ताहर | Sinnar
तालुक्यातील पांगरी (pangari) येथे काही दिवसांपासून सतत विजेचा (electricity) खोळंबा होत असल्याने शेतकरी (farmers) हवालदिल झाले आहेत.
गावात सिंगल फेज वीजही उपलब्ध नसल्याने विजेवरील उपकरणे निकामी झाली आहेत. त्यामुळे पांगरी व परिसरातील गावांसाठी वीज उपकेंद्र (Power substation) मिळण्याची मागणी शेतकरी संघटनेने (Farmers Association) तहसीलदारांना निवेदन (memorandum) देत केली आहे.
गावातील पगार वस्तीरील रोहित्र जळाल्याने परिसरातील शेतकर्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विहिरींना मुबलक पाणी असून देखील विजेअभावी पिकांना पाणी देण्यास अडचण निर्माण होत आहे. थ्री फेज रोहित्र जळाल्यानंतर सिंगल फेज रोहीत्र जळाल्याने परिसरातील घरांमध्ये अंधार पसरला आहे. त्यामुळे घरातील विजेवर चालणारी सर्व उपकरणे निकामी झाले आहेत. 1 महिन्यापासून वीज नसल्याने मोबाईल चार्जिंग (Mobile charging) करण्यासाठी दुसर्याकडे जावे लागत आहे.
जळालेल्या रोहित्रावर पाच अश्वशक्तिचे 28 जलपंप, 20 घरगुती मीटर, 10 पोल्ट्री फार्म आहेत. गेल्या महिनाभरापासून येथे वीज नसल्याने शेतकर्यांचे (farmers) मोठे नुकसान होत आहे. रोहित्रावर जादा भार झाल्याने रोहित्र नेहमी जळत आहे. अशीच परिस्थिती गावातील अनेक भागात, मळ्यात असल्याने शेतकर्यांची पिके पाण्याअभावी डोळ्यांसमोर जळून जात आहेत. वीज वितरणच्या (power distribution) अधिकार्यांकडे वेळोवेळी तक्रार करुनही वीज पुरवठा (Power supply) सुरळीत होत नाही.
यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा (agitation) इशारा शेतकर्यांनी दिला आहे. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष आत्माराम पगार, अर्जुन पगार, सूर्यभान पगार, विलास वारुळे, शिवाजी पगार, सोमनाथ पगार, गोविंद पगार, संजय पगार, जगन पगार, एकनाथ पगार, सोमनाथ पगार, विजय धुमाळ, मयुर धुमाळ यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.