उड्डाणपूल करा किंवा रेल्वे गेट खुले करा

खेरवाडी ग्रामस्थांचे रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन
उड्डाणपूल करा किंवा रेल्वे गेट खुले करा

खेरवाडी। वार्ताहर Kherwadi-Niphad

येथील रेल्वे गेट क्रमांक 95 वरील उड्डाणपुलाचे (Flyover) भूमिपूजन (bhumipujan) होऊन व रेल्वे गेट (Railway gate) बंद करून आठ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही काम सुरू न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी 2 केंद्रीय रेल्वेमंत्री (Union Railway Minister) रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची भेट घेत उड्डाणपुलाचे काम सुरू करा अन्यथा रेल्वे गेट तत्काळ उघडा या मागणीचे निवेदन (memorandam) देत त्यासाठी आंदोलनाचा (Movement) इशारा दिला आहे.

रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खेरवाडी गावच्या भौगोलिक रचनेनुसार हे रेल्वेगेट गावच्या मध्यभागी असल्याने गाव दुभंगले आहे. अनेक शेतकरी (farmers) व विद्यार्थ्यांना (students) ये-जा करण्यासाठी अडथळ्याची शर्यत पार करावी लागत आहे. तर अनेक दुचाकीस्वारांना 1 कि.मी. चा वळसा मारून प्रवास करावा लागत आहे. तर शेतमाल वाहतूकीलाही अडथळे येत आहे. तर सुकेणा (sukene) व ओढा (odha) रेल्वे गेट साठी विनाकारण 15 कि.मी. चा हेलपाटा मारावा लागत आहे.

येथील अनेक दुकाने रेल्वेगेटच्या पलिकडून असल्याने त्यांच्या व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. उड्डाणपूलाबाबत ग्रामस्थांनी रेल्वे प्रकल्प व्यवस्थापक डी.आर.एम. भुसावळ व संबंधित अधिकार्‍यांना अनेकवेळा निवेदने दिली तसेच पत्रव्यवहार केला. फोनद्वारे संपर्क साधला. मात्र त्यांचेकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे.

मात्र उड्डाणपूलाचे काम सुरू करायचे नसेल तर येथील रेल्वे गेट तत्काळ उघडून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी. अन्यथा त्याबाबत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विलास पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा योगिता आवारे, ग्रामपंचायत सदस्य अ‍ॅड.संदीप पवार, रतन बांडे, अरुण संगमनेरे, अनिल संगमनेरे, ग्रामस्थ बी.जी. पाटील, पी.के. पाटील,

अशोक आहेर, सोमनाथ संगमनेरे, बाळेश्वर पगारे, योगेश जाधव, काशिनाथ संगमनेरे, शंकर संगमनेरे, गणेश रावसाहेब आवारे, नंदलाल बारकू आवारे, संजय बुब, दिलीप संगमनेरे, संजय जगन्नाथ आवारे, मधूकर आवारे, शैलेश शेलार, अब्दुल शेख, मनोज भोकनळ, लखन पाटील, तुषार पवार, अर्षद शेख, प्रभाकर मोगल, संजय बोरसे, नंदू मणियार,

भूषण जाधव, कैलास आवारे, विकास संगमनेरे, जाधव, बुरके, उगले, सताळे, बोंबले, गांगुर्डे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शेतकर्‍यांनी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांचेपुढे शेतकरी, विद्यार्थी, चाकरमानी यांना येणार्‍या विविध अडचणींचा पाढा वाचून त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com