जुने नाशिक | Old Nashik

सुमारे 400 वर्षांची परंपरा असलेल्या येथील सर्व धर्मियांचे मोठे श्रद्धास्थान असलेले पीर सय्यद सादिक शाह हुसैनी बाबा बडी दर्गा शरीफ साधारण 9 महिन्यानंतर...

भाविकांसाठी सोमवार (दि.15) पासून उघडले आहे. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करीत भाविकांना दर्शन देण्यात येणार असल्याचे विश्वस्तांच्या वतीने सांगण्यात आले आहेत.

65 वर्षावरील तसेच दहा वर्षाखालील भाविकांनी येण्याचे टाळावे, प्रत्यकाने सॅनिटायझरचा वापर करावा तसेच तोंडावर मास्क लावून दर्शनासाठी यावे, जास्त गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. करोनाच्या सुरुवातीलाच जनता कर्फ्यू ची हाक देण्यात आली होती.

तेव्हापासून विश्वस्तांनी पुढाकार घेऊन गर्दी टाळण्यासाठी भाविकांसाठी दरबाराचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले होते, यानंतर शासनाने देखील धार्मिक इतर बंद करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान मधल्या काळात ठराविक लोक आत मध्ये जाऊन धार्मिक विधी नियमित करीत होते तर इतर भाविक बाहेरून दर्शन घेऊन प्रार्थना करताना दिसत होते,

मात्र कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची पुरेपूर खबरदारी देखील घेण्यात आली. उद्यापासून शासनाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून बडी दर्गा शरीफ देखील सुरू होणार आहेत.

त्याचप्रमाणे शहर परिसरातील सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे देखील सुरू होणार असून मशिदींमध्ये नियमित मोठ्या संख्येने लोक नमाजसाठी येणार आहेत.

जोपर्यंत शासनाने आदेश दिले नाही तोपर्यंत मुस्लिम बांधवांनी अत्यंत संयम दाखवून शासनाला सहकार्य केल्याबद्दल याची चर्चा होत आहे.